वाढती उष्णता आणि पित्तामुळे तुम्हालाही होऊ शकतो तोंडातील अल्सर; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:09 AM2020-05-02T11:09:16+5:302020-05-02T11:33:49+5:30

शरीरातील पित्त वाढल्यामुळे अशी समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला तोंडाचा अल्सर दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.

Home remedies for preventing mouth ulcer myb | वाढती उष्णता आणि पित्तामुळे तुम्हालाही होऊ शकतो तोंडातील अल्सर; 'असा' करा बचाव

वाढती उष्णता आणि पित्तामुळे तुम्हालाही होऊ शकतो तोंडातील अल्सर; 'असा' करा बचाव

googlenewsNext

सध्या उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे वातावरणातील गरमीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. उन्हाळ्यात सगळ्यांनाच खूप घाम येतो. त्याबरोबरच शरीरातील उष्णता वाढून वेगवेगळया समस्या उद्भवायला सुरूवात होते.  उष्णता वाढली की हाता-पायांची आग होणं, ओठ फाटणं, लघवी करताना जळजळणं, स्किन इन्फेक्शन ,घामोळ्या तसंच खाज खुजली होण्याच्या समस्या उद्भवतात.  

तोंडाच्या अल्सरची समस्या १ -२ वेळा सगळयांनाच उद्भवते. काहीजणांना ३ ते ४ दिवस तर काहींना १५ दिवस या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे खायला प्यायला त्रास होऊन शरीरातील अशक्तपणा वाढत जातो. शरीरातील पित्त वाढल्यामुळे अशी समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला तोंडाचा अल्सर दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान करत असाल तर तुम्हाला तुम्हाला देखील अल्सर होण्याची शक्यता अधिक आहे. धूम्रपान म्हणजे तंबाखू आणि त्यातही तुम्ही तो जाळून शरीरात घेता त्यामुळे तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपान केल्यानंतर तुम्हाला अल्सरचा त्रास होऊ शकतो.

तुलशीच्या पाण्याच्या गुळण्या करा

तोंडाच्या अल्सर पासून सुटका मिळवण्याासाठी तुळस फायदेशीर ठरते.  कारण तुळशीच्या पानात अँटीबॅक्टेरिअल, अँटीव्हायरल गुण असतात.  तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने व्हायरस आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. त्यासाठी २ ग्लास पाण्यात १० ते १२ तुलशीची पानं घाला आणि उकळून घ्या. त्यानंतर थंड करा. या पाण्यात २ चमचे मीठ घालून गुळण्या करा. सलग दोन दिवस हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

हळद

हळद अँटीसेप्टीक आहे. अल्सर ही एक प्रकारची जखमच आहे. त्यामुळे तुम्ही  दुधात हळद घालून पिऊ शकता.  तुम्हाला हळदीचे सेवन अशापद्धतीने करता येईल. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते आणि तोंडातील अल्सरपासून आराम मिळतो. 

नारळ

सुकं खोबरं,  खोबर्‍याचं  तेल तसेच नारळाचं  पाणी हे  तीनही घटक  तोंडातील  अल्सरपासून आराम  मिळवण्यास मदत  करतात. त्यासाठी सुकं खोबरं चखळून खा. सतत दोन दिवस हा प्रयोग केल्यास समस्या कमी होईल. याशिवाय नारळाचं पाणी शरीरातील उष्णता कमी करून शरीर थंड ठेवतं. म्हणून तुम्ही नारळपाणी पिऊन अल्सरची समस्या दूर करू शकता. ( हे पण वाचा-कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा)

मध

मधात औषधी गुणधर्म असल्याने डिहायड्रेशनच्या  त्रासापासून आराम  मिळण्यास मदत  होते. मधामुळे अल्सर कमी होण्यास  मदत  होते. मधातील  अ‍ॅन्टी-मायक्रोबियल  घटकांमुळे तोंडातील अल्सर लवकर बरा होण्यास मदत  होते. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोना संक्रमणाविरूध्द लढणाऱ्या सायकोटीनपासून शरीराला असू शकतो धोका)

Web Title: Home remedies for preventing mouth ulcer myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.