अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:26 AM2019-07-26T11:26:51+5:302019-07-26T11:34:44+5:30

अ‍ॅनिमिया म्हणजे, अशी स्थिती जेव्हा शरीरातील रेड ब्लड सेल्स कमी होतात. अ‍ॅनिमियाचे अनेक प्रकार असतात. ज्यांमध्ये सर्वात जास्त आढळून येणारा प्रकार म्हणजे, आयर्नच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया. 

Home remedies for low iron anemia in marathi | अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

googlenewsNext

(Image Credit : FamilyDoctor.org)

अ‍ॅनिमिया म्हणजे, अशी स्थिती जेव्हा शरीरातील रेड ब्लड सेल्स कमी होतात. अ‍ॅनिमियाचे अनेक प्रकार असतात. ज्यांमध्ये सर्वात जास्त आढळून येणारा प्रकार म्हणजे, आयर्नच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया. 

आपल्या शरीरात असणाऱ्या रेड ब्लड सेल्समध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं. ज्यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं. आयर्नच्या कमतरतेमुळे शरीर जास्त हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही. ज्यामुळे रेड ब्लड सेल्स कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन रिच ब्लड फ्लो कमी होतो. 

अ‍ॅनिमिया का होतो? 

  • मासिक पाळीतील रक्तस्राव, मूळव्याध, रक्तस्राव वाढणारे आजार
  • आजार अंगावर काढणे
  • आहारात लोह व प्रथिनांचे प्रमाण कमी
  • सकस आहाराचे कमी प्रमाण

 

अ‍ॅनिमियाची लक्षणं : 

  • थकवा येणे
  • दम लागणे
  • चिडचिडेपणा
  • एकाग्रता कमी होणे
  • रोगप्रतिकार शक्ती कमी होणे 

(Image Credit : Everyday Health)

मानवी शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे?

आरोग्य उत्तम राखण्यासाठी स्त्रियांना 12.5, पुरूषांना 13 ग्रॅम, तर गरोदर स्त्रियांमध्ये 11 ग्रॅम हिमोग्लोबिनची आवश्यकता असते. 

अ‍ॅनिमिया झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ला घेणं आवश्यक असतं. तसचे काही घरगुती उपायांच्या मदतीनेही अ‍ॅनिमियाची समस्या दूर करणं शक्य असतं. 

आयर्न रिच फूड : 

  • मासे आणि मांस 
  • सोया प्रोडक्ट 
  • अंडी
  • ड्राय फ्रूट्स 
  • दूधी भोपळा
  • हिरव्या पालेभाज्या
  • नट्स आणि ग्रीन बीन्स 

 

फोलेट अ‍ॅसिड :

फोलेट अ‍ॅसिड वाढवण्यासाठी फोलेट व्हिटॅमिन बी हा एक प्रकार असतो. जो शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतो. यामुळे शरीराला प्रॉपर ऑक्सिजन पोहोचण्यास मदत मिळते. या पदार्थांमधून तुम्हाला फोलेट मिळू शकतं. 

  • पालक
  • तांदूळ
  • शेंगदाणे
  • राजमा
  • अवोकाडो

(Image Credit : tctmd.com)

आयर्न अब्जॉर्ब करण्यासाठी... आयर्न शरीरामध्ये व्यवस्थित अब्जॉर्ब होण्यासाठीही अनेक फूड प्रोडक्ट्स मदत करतात. 

  • मासे 
  • रताळं
  • गाजर 
  • आंबा
  • संत्री 
  • डाळिंब 

अनिमियासाठी कोणता आहार घ्यावा?

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ नये, तसेच ते नियंत्रणात ठेवता यावे यासाठी लोह तसेच प्रथिनेयुक्त आहाराची गरज असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य, डाळी, सुकामेवा, गूळ, फळे, टरबूज यांचा प्रामुख्याने समावेश असावा. 

शाकाहरी व्यक्तीला अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी दूध आणि लोहयुक्त पदार्थांशिवाय दुसरा पर्याय नाही. मांसाहारी व्यक्तीने मासे, मटन, चिकन, अंडी यांचा वापर नियमित करावा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Home remedies for low iron anemia in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.