शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

सफरचंदाची सालदेखील शरीरासाठी आरोग्यदायी, वाचा 8 गुणकारी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 2:35 PM

आहारामध्ये नियमित रोज एका सफरचंदाचं सेवन केल्यानं तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासत नाही, असे आपण नियमित कोणा-न्-कोणाकडून ऐकत असतोच.

मेघना वर्मा / नवी दिल्ली - आहारामध्ये नियमित रोज एका सफरचंदाचं सेवन केल्यानं तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासत नाही, असे आपण नियमित कोणा-न्-कोणाकडून ऐकत असतोच. काहींना सफरचंदाचा रस आवडतो, तर काही जण सफरचंदाची साल सोलून त्याचे सेवन करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ?, केवळ सफरचंदच नाही तर सफरचंदाच्या सालीतही शरीरासाठी फायदेशीर ठरणारे पोषक असे जीवनसत्त्व असतात.  केवळ हृदयाचं आरोग्य नाही तर डायबिटीजसोबत वजनदेखील नियंत्रणात आणण्यास याची मदत होते. कोणत्याही फळांची साल खाल्ल्यास मूतखडा होतो, असा गैरसमज आहे. मात्र, सफरचंदच्या सालीमध्ये प्रचंड प्रमाणात पौष्टिक जीवनसत्त्व असतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सफरचंदाची साल शरीराचे वजन घटवण्यात मदत करतेच, मात्र त्वचेसंबंधी समस्यादेखील कमी करण्यास मदत मिळते.

जाणून घेऊया सफरचंदाच्या सालीचे महत्त्व

1. डायबिटीज नियंत्रणात आणण्यास करते मदतडायबिटीजपासून हैराण झालेल्यांसाठी सफरचंदाचं साल अत्यंत लाभदायक आहे. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यात मदत मिळते. यामुळे रक्त शुद्धीकरणाची प्रक्रियादेखील होते. 

2. वजन घटवते  शरीराच्या वाढलेल्या वजनानं त्रस्त झालेल्या सर्वांनी सफरचंद सालीसकट खावे. शरीरात साठलेली अनावश्यक चरबी घटवण्यास ही साल मदत करते. सफरचंदाच्या सालीमध्ये उर्सोलिक अॅसिड नावाचं द्रव्य असतं, यामुळे वाढलेले वजन कमी करण्यास सफरचंद व त्याची साल महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. 

3. हृदय रोगांपासून बचाव करते सफरचंदाची साल जर तुम्हाला हृदयविकारांनी ग्रासलेले असेल तर सालीसहीत सफरचंद खाल्ल्यानं हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.  सफरचंदाच्या सालीमध्ये असणारे फायबर्स शरीरातील कोलेस्ट्रोलचा स्तर कमी करण्यात मदत करते. यामुळे हदय विकारांपासून बचाव होतो. सोबतच बद्धकोष्ठतेचाही त्रास कमी होतो. 

4. कर्करोगाविरोधात लढण्याची वाढते क्षमता कर्करोगासारख्या आजारांविरोधात लढण्यासाठी सफरचंदाची साल ब-याच प्रमाणात मदत करते. यातील ट्रिटरपेनाइड्स नामक तत्त्वांमध्ये कर्करोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढवते. स्तनाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग यांसारख्या कर्करोगांपासून बचाव करण्यात मदत सफरचंदाची साल मदत करते. 

5. बुद्धी तल्लख राहण्यास मदत विकारांपासून मेंदूचं संरक्षण करण्याचे काम सफरचंदाची साल करते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेंदूच्या पेशींचं नुकसान होऊ नये, यासाठी सफरचंदाची साल फायदेशीर ठरते. बुद्धी तल्लख होण्यास व विचारशक्तींची क्षमता वाढवण्यासही मदत मिळते. 

6. फुफ्फुसांना निरोगी ठेवतेज्यांना श्वसन मार्गासंबंधी तक्रीर आहेत किंवा फुफ्फुसांसंबंधी कोणत्याही समस्या असल्यास त्यांनी नियमित सफरचंदाचे सेवन करावे. सफरचंद व त्याच्या सालीतील पौष्टिक तत्त्वांमुळे शरीराचे आरोग्य सुधारते. 

7. डोळ्यांसाठी लाभदायक  मोतीबिंदूविरोधात लढण्यासाठी सफरचंदाची साल खूपच फायदेशीर आहे. सोबतच डोळ्यांची दृष्टीदेखील सुधारते.   

8. अॅनिमिया रोगविरोधात लढण्यास उपयुक्तअॅनिमिया रोगानं ग्रासलेल्या व्यक्तींसाठी सफरचंदाची साल अतिशय फायदेशीर असे आहे. अॅनिमियामुळे शरीरातील लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होते. यामुळे रक्ताचं प्रमाणदेखील कमी होते. परिणामी थकवा, हाडे कमकुवत इत्यादी समस्या निर्माण होतात. मात्र सफरचंदाच्या सालीमध्ये लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअमचे प्रमाण प्रचंड असे आहेत. यामुळे अॅनिमिया रोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते.  

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नdiabetesमधुमेह