तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:17 IST2025-04-12T15:16:51+5:302025-04-12T15:17:59+5:30

Heat Wave : हीटवेव किंवा वाढत्या तापमानात छोटीशी चूक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण तापमानात झालेली वाढ हृदयासाठी घातक ठरू शकते.

Heat waves increase risk of heart disease, know how to protect your heart during summer | तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला?

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला?

Heat Wave : देशातील वेगवेगळ्या भागात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. IMD नं अनेक ठिकाणी तापमानाबाबत यलो हीटवेव्ह अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD नुसार काही दिवसांमध्ये उत्तर भारतात अनेक राज्यात हीटवेवचा प्रभाव दिसू शकतो. हीटवेव किंवा वाढत्या तापमानात छोटीशी चूक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण तापमानात झालेली वाढ हृदयासाठी घातक ठरू शकते.

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव 

एक्सपर्टनुसार, हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. जास्त तापमान वाढल्यानं शरीर स्वत:ला थंड ठेवू शकत नाही. ज्यामुळे आतलं तापमान वाढतं. अशात हार्ट रेट वाढतो आणि यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

ब्लड फ्लो 

हीट स्ट्रोकमुळे शरीराचं तापमान वाढू शकतं. हीट स्ट्रोक अशी कंडीशन आहे ज्यात आपल्या वातावरणाचं तापमान इतकं वाढतं की, आपलं शरीर स्वत:ला थंड करू शकत नाही. त्यामुळे ब्लड फ्लो स्लो होतो. तापमान वाढल्यानं रक्त घट्ट होतं. ज्यामुळे ब्लड फ्लो करण्यासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो. याचकारणानं स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

कुणाला जास्त धोका

हृदयासंबंधी समस्या आधीच असलेल्या लोकांना वाढत्या तापमानापासून अधिक असतो. त्याशिवाय वृद्ध लोकांना याचा धोकाही अधिक असतो. अशात हृदयरोग असलेल्यांनी वाढत्या तापमानात हृदयाची काळजी घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कधी घ्याल काळजी?

वाढत्या तापमानात स्वत:ची काळजी घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ठरते ती म्हणजे शरीर हायड्रेटेड ठेवणं. यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावे आणि सोबतच दही, लस्सी, ताक प्यावे व कलिंगड, काकडी आणि खरबूज अशी फळं खावीत.

तेलकट खाणं टाळा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी गरम आणि तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तेकलट पदार्थांऐवजी मोड आलेले कडधान्य, उकडलेल्या भाज्या खायल्या हव्यात.

विनाकारण बाहेर जाणं टाळा

फार काही महत्वाचं काम नसेल तर दुपारच्या वेळी बाहेर जाणं टाळलं पाहिजे. कारण यावेळी तापमान जास्त असतं. बाहेर जायचंच असेल तर दुपट्टा, रूमाल बांधून जायला हवं.

Web Title: Heat waves increase risk of heart disease, know how to protect your heart during summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.