पुरूषांपेक्षा महिलांमध्ये वेगळी असतात हार्ट फेल्युअरची लक्षणं, जाणून घ्या कोणती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:46 PM2020-03-18T12:46:57+5:302020-03-18T13:31:47+5:30

या लक्षणांचे निदान होईपर्यंत इतर अनेक आजारांच्या महिला शिकार झालेल्या असतात.

heart failure treatment and symptoms in women myb | पुरूषांपेक्षा महिलांमध्ये वेगळी असतात हार्ट फेल्युअरची लक्षणं, जाणून घ्या कोणती

पुरूषांपेक्षा महिलांमध्ये वेगळी असतात हार्ट फेल्युअरची लक्षणं, जाणून घ्या कोणती

Next

आरोग्य तज्ञांच्यामते महिला आणि पुरूष यांच्या शरीरातील बदलामुळे त्यांना उद्भवणारे आजार सुद्धा वेगळे असतात.  ही बाब हृदयाच्या आजाराशी निगडीत लागू होते.  अनेकदा या आजारांच्या लक्षणांना ओळखणं सुद्धा कठीण होऊन बसतं.हार्ट फेल्युअरच्या आजारात पुरूषांच्या तुलनेत महिलांना खूप वेगळी लक्षणं दिसत असतात. परिणामी या लक्षणांचे निदान होईपर्यंत इतर अनेक आजारांच्या महिला शिकार झालेल्या असतात.
‘हार्ट फेल्युअर’  ही एक गंभीर समस्या असून वेळेत निदान आणि उपचार झाल्यास धोका कमी होतो.


हार्ट फेल्युअरची कारणं

हार्ट अ‍ॅटक 

उच्च रक्तदाब

कार्डिओमायोपथी

फुफ्फुसांचा आजार

डायबिटीस

लठ्ठपणा

मादक पदार्थांचे सेवन

या कारणांमुळे श्वसनविषयक आजारदेखिल होऊ शकतात.पण महिलांध्ये या आजाराचं स्वरूप वेगळं दिसून येतं. साधारणपणे ४० वयानंतर मेनोपॉजच्या वेळी महिलांना हार्ट फेल्युअरची समस्या जाणवते. सोबतच वजन वाढतं. हातापायांना सुज येते, सांधेदुखीच्या वेदना होतात. महिलांमधील हार्मोन एस्ट्रोजन आणि पुरूषांमधील हार्मोन टेस्टोस्टेरॉन यांच्या असंतुलनामुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. म्हणून अचानक वजन वाढल्यास  किंवा वजन कमी- जास्त होतं तेव्हा बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. (हे पण वाचा-Corona virus : ट्रेन आणि बसच्या प्रवासामुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'अशी' घ्या काळजी....)

हार्ट फेल्युअरने त्रस्त रुग्णांमध्ये हृदयातील स्नायू कमकुवत होत जात असल्यामुळे रक्‍ताचे प्रवाह शरीरात योग्यरित्या होत नाही. यामुळे नेहमीची कामे करताना सतत थकल्यासारखे वाटू शकते. हार्ट फेल्युअरसारख्या आजारावर वेळेवर निदानासह प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते. (हे पण वाचा-Corona virus : 'या' उपायांनी फोनमुळे होणाऱ्या बॅक्टेरीअल आणि व्हायरल इन्फेक्शनचा टळेल धोका) 

Web Title: heart failure treatment and symptoms in women myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.