Corona virus : 'या' उपायांनी फोनमुळे होणाऱ्या बॅक्टेरीअल आणि व्हायरल इन्फेक्शनचा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:07 AM2020-03-18T11:07:21+5:302020-03-18T11:22:18+5:30

मोबाईलमुळे सुद्धा तुम्हाला कोरोनाच्या इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो.

Corona virus : Mobile phones can causes bacterial and viral infections, Know how to prevent | Corona virus : 'या' उपायांनी फोनमुळे होणाऱ्या बॅक्टेरीअल आणि व्हायरल इन्फेक्शनचा टळेल धोका

Corona virus : 'या' उपायांनी फोनमुळे होणाऱ्या बॅक्टेरीअल आणि व्हायरल इन्फेक्शनचा टळेल धोका

Next

जगभरात कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात सुद्धा कोरोनामुळे लोकांचे जीव जायला सुरूवात झाली आहे. या व्हायरसला स्वतःपासून लांब ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.  अगदी प्रवास करत असताना तसंच रोजच्या वापरातील वस्तु हाताळत असताना स्वच्छतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्यांच्याच हातात २४ तास मोबाईल असतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण मोबाईलमुळे सुद्धा तुम्हाला कोरोनाच्या इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला फोनला व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून कसं दूर ठेवायचं याबाबत सांगणार आहोत.

अमेरिकन मेडीकल जर्नलच्या २०१७ च्या अभ्यासानुसार स्मार्टफोनवर सगळ्यात जास्त व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात.  सुरूवातीला या गोष्टीला कोणीही  गांभिर्याने घेतलं नव्हतं. पण सध्या जगभरात कोरोनाची लागण होत असल्यामुळे जगभरातील लोकांनी याची दखल घेतली आहे.

मऊ कापडाने साफ करा

तुमच्या स्मार्टफोनला साफ करण्यासाठी सगळ्या सोपा उपाय म्हणजे मऊ कापडाने  पुसा. एक कपडा ओला करा आणि पाण्यात भिजवून आपला स्मार्ट फोन क्लिन करा. त्यामुळे जर्म्स नाहिसे होतील. आपला स्मार्टफोन  दर दोन तासांनी सॅनिटायजरने स्वच्छ केला पाहिजे. तुम्ही जर सतत फोन वापरत असाल तो हात आपल्या चेहऱ्याला लावू नका.

अल्कोहोलचा वापर करा

अल्कोहोलने मोबाईल स्वच्छ केल्यास व्हायरस दूर होऊ शकतो. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सॅनिटायझरने हात स्वच्छ करून मग मोबाईल साफ करा. ( हे पण वाचा- Corona Virus : 'या' Blood group च्या लोकांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा)

मोबाईल ठेवत असलेली जागा

 स्मार्ट फोन टेबल किंवा डेस्कवर ठेवत असताना स्वच्छ आहे की नाही हे पाहून मगच ठेवा. कारण इन्फेक्टेड जागेवर जर तुम्ही स्मार्ट फोन ठेवला तर  व्हायरसशी तुमचा संपर्क होऊ शकतो. म्हणून एखादया कापडाने ती जागा स्वच्छ करून मगच त्यावर मोबाईल ठेवा. ( हे पण वाचा-Corona virus : ट्रेन आणि बसच्या प्रवासामुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'अशी' घ्या काळजी....)

 

Web Title: Corona virus : Mobile phones can causes bacterial and viral infections, Know how to prevent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.