शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Heart disease symptoms : साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 11:52 IST

Heart disease symptoms : अनेकदा सध्या वाटत असलेल्या लक्षणांमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. 

जगभरात हृदयाच्या आजारानं अनेकांना जीव गमवावा लागतो.  जसजसं वय वाढत जातं तसतसं हृदयाच्या आजारांचा धोका वाढत जातो. वयाची पन्नाशी पार केल्यानंतर जास्तीत जास्त या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा सध्या वाटत असलेल्या लक्षणांमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. 

हाय ब्लड प्रेशर

सध्या हाय ब्लड प्रेशरची समस्या सगळ्यांमध्येच कॉमन जाणवत आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. जर तुमचे आई वडील हाय ब्लड प्रेशरच्या समस्येनं ग्रासलेले असतील तर तुम्हीही तपासणी करून घ्यायला हवी. हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढल्यास हृदयाचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. 

हाय ब्लड शुगर

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे कोरोनरी आर्टरीज डिसीजचा धोका वाढतो.  रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर धमन्यांवर याचा परिणाम होतो.  त्यामुळे रक्त वाहिन्यांच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.  त्यासाठी विशिष्ट  वयानंतर वेळोवेळी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यायला हवी. 

हाय कोलेस्ट्रॉल

शरीत फॅट्स जास्त जमा झाल्यास हाय कॉलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच कॉलेस्ट्रॉलची समस्या टाळायची असेल तर नियमित हिरव्या भाज्या, फळांचा आहारात समावेश करा आणि फॅटफूल पदार्थांपासून लांब राहा.

चक्कर येणं

चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात. सगळ्यात महत्वाचं लक्षणं म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो. या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला कफची समस्या असून हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. 

श्वास घ्यायला त्रास होणं

अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिने चढताना- उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये अनेकदा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो. काहीही खाल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. याशिवाय  काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळणं यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

 अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

पायांमध्ये सुज

तळव्यांना सतत सुज येणं हे देखिल हृदयाच्या आजाराचं कारण ठरू शकतं.  अनेकदा शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसल्यामुळे तळव्यांना सुज येते. 

कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

छातीत दुखणं

बर्‍याच वेळा सायलेंट हार्ट अटॅकमध्ये छातीत दुखणे इतके सौम्य होते की एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याला गॅस किंवा पोटाच्या आजारामुळे ग्रासले आहे. म्हणूनच, जेव्हा आपल्याला छातीत दुखण्यासह इतर लक्षणे दिसतील तेव्हा काळजी घ्या. सामान्यत: सामान्य हार्ट अटॅकनंतर सायलेंट हार्ट अटॅक या दोन्हींचा धोका वाढतो. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी आणि मधुमेहामुळे एखाद्या व्यक्तीला या आजारांचा धोका असू शकतो.  

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य