शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

Heart attack : हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरू शकतं ब्लड प्रेशरचं वाढणं, धोका टाळण्यासाठी घ्या या गोष्टींची काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:19 PM

Heart Attack : हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वजन आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवून तुम्ही हार्ट अटॅकचा धोका कमी करू शकता.

हाय बीपीची (High BP) समस्या रूग्णांमध्ये हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका वाढवते. जर तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलंल असेल तर हे तुमच्यासाठीही धोकादायक ठरू शकतं. अलिकडे तर हार्ट अटॅकला वयाचंही बंधन राहिलेलं नाही. हार्ट अटॅक लहान वयांच्या लोकांनाही येतो. अशात हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वजन आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवून तुम्ही हार्ट अटॅकचा धोका कमी करू शकता.

बीपी वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. बीपीची समस्या वाढल्याने कोलेस्ट्रॉल किंवा फॅट वाढू शकतं. बीपी वाढल्याने रूग्णाच्या छातीतही वेदना जाणवू शकते.

हाय बीपी कसा कराल कंट्रोल?

बीपीची समस्येत औषधांसोबतच काही नॅच्युरल पद्धतीने ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यास मदत मिळते.

- हायपरटेंशनची लक्षणं कमी करण्यासाठी जेवणात मिठाचं सेवन कमी करा.

- सोडिअमचं जास्त सेवन केल्याने बीपीची समस्या वाढते.

- तळलेल्या पदार्थांचं सेवन पूर्णपणे बंद करा.

हार्ट अटॅकचे संकेत ओळखा 

जर श्वास घेण्यास त्रास होत असेल, घाम जास्त येत असेल, मळमळ होत असेल, हलकी डोकेदुखी होत असेल, पायांवर सूज आलेली असेल किंवा शरीराच्या वरच्या भागात त्रास होत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. हायपरटेंशनची समस्या किडनी फेलिअर, ब्रेन स्ट्रोक, मल्टीपल ऑर्गन फेलिअरमुळेही हे होऊ शकतं.

किती असावा नॉर्मल बीपी?

एक्सपर्टनुसार, बीपीची नॉर्मल रेंज १३५ ते १४५ दरम्यान आहे. जर यापेक्षा जास्त बीपी असेल तर अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. बीपी जर १४०/९० पेक्षा जास्त असेल तर हा हाय बीपी मानला जातो. जर बीपी लोक असेल तर याने थकवा आणि आळससारखी लक्षणं दिसू शकतात. सामान्य बीपी रीडिंग 90/60mmHg आणि 120/80mmHg दरम्यान असते.

(टिप : वरील लेखातील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर दिली आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. जर तुम्हाला काही समस्या असेल तर  वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य