HEALTH : पावसाळ्यात वर्क आऊट करताना कशा प्रकारचे कपडे वापराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 18:09 IST2017-07-21T12:39:28+5:302017-07-21T18:09:28+5:30

जाणून घेऊया पावसाळ्यात वर्क आऊटला जाताना कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे.

HEALTH: What kind of clothes will you use when working out in the rainy season? | HEALTH : पावसाळ्यात वर्क आऊट करताना कशा प्रकारचे कपडे वापराल?

HEALTH : पावसाळ्यात वर्क आऊट करताना कशा प्रकारचे कपडे वापराल?

लिब्रिटी आणि वर्क आऊट जणू समिकरणच झाले आहे. विशेष म्हणजे वर्क आऊटला जातानाही प्रत्येक सेलिब्रिटींची फॅशन पाहावयास मिळते. प्रत्येक ऋतूमध्ये त्यांच्या कपड्यांची चॉईस बदलते. सध्या पावसाळा सुरु असून या ऋतूत शरीराला सूट होतील असेच कपडे ते परिधान करतात. आपणही या पावसाळी वातावरणात योग्य कपड्यांची निवड करायला हवी.

जाणून घेऊया पावसाळ्यात वर्क आऊटला जाताना कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे. 

* पावसाळ्यातील किटाणू व बॅक्टेरिया घाम आणि तेलासोबत मिसळून आपल्या शरीरावर अधिक रॅशेस निर्माण करतात. यासाठी दमटपणा दूर करणारे व सूक्ष्मजीवरोधक कपडे वर्कआऊटच्या वेळी घालणे योग्य ठरते. 

* लवकर सुकणारे स्पॅनडेस्क, पॉलिस्टर व नायलॉन हे कपडे पावसाळ्यात घालण्यासाठी उत्तम आहेत. पाऊस गेल्यानंतर येणारा घामही हे कपडे शोषून घेतात. हे कपडे मजबूत, हलके व ताणता येणारे असतात. 

* परफॉर्मन्स फॅब्रिक धुण्यासाठी अगदी सोपे असून हे लगेच सुकते. या कापडाला वाळवण्यासाठी सूर्यप्रकाश शोधत बसण्याची गरज नसते. यामुळे तुम्ही प्रत्येक वर्कआऊटदरम्यान ताजेपणा अनुभवाल. 

* उत्तम फिटिंगसाठी सीमलेस कापड योग्य आहे. या कापडामुळे घर्षण किंवा खाज येणे असे प्रकार होत नाहीत. सध्याच्या दमट दिवसांसाठी हे कपडे आरामदायक ठरतात. 

* वर्क आऊट करताना केस जागच्या जागी राहावे, चेहºयावर अतिरिक्त तेल किंवा घाम येऊ नये यासाठी हेडबँडने केस बांधून ठेवा. 

Web Title: HEALTH: What kind of clothes will you use when working out in the rainy season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.