शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अनेक गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी नियमित खा कांद्याची पात, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 16:59 IST

Spring onion benefits : या दिवसात कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. याचे काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Spring onion benefits :  कांद्याचे भाव आता इतके वाढले आहे की, लोकांच्या खाण्यातून कांदा गायब व्हायला आलाय. पण तरी कांद्याचे फायदे काही कमी होत नाहीत. कांद्याने आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला चांगलेच माहीत असतील. जसे कांद्याचे आरोग्याला फायदे आहेत तसेच कांद्याच्या पातीचेही आरोग्याला कितीतरी फायदे होतात. पण याकडे फारसं कुणी लक्षच देत नाही. हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. त्यामुळे या दिवसात कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. याचे काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हृदयासाठी फायदेशीर

कांद्याच्या पातीमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व डीएनए आणि सेल्स टिशूंचं होणारं डॅमेज रोखते. तसेच यातील व्हिटॅमिन सी कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचं प्रमाण कमी करण्यासही मदत करतं. ज्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो. त्यामुळे नियमित कांद्याच्या पातीचं सेवन करणं गरजेचं आहे.

हाडे होतात मजबूत

कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात ज्याने शरीरातील हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सी हाडांमुळे कोलेजन वाढवत त्यांना मजबूत करतात. तर यानेच बोन डेन्सिटी मेन्टेन ठेवण्यासही मदत मिळते. अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी हाडे कमजोर होत आहेत. अशात कांद्याच्या पातीचा तुम्हाला फायदा मिळू शकतो.

वायरल तापापासून बचाव

अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-वायरस तत्त्व असलेल्या कांद्याची पातीने फ्लू, इन्फेक्शन आणि वायरलच्या व्हायरसपासून शरीराची रक्षा केली जाते. तसेच याने श्वसन तंत्रही हेल्दी राहतं. त्यामुळे नियमित होणाऱ्या समस्या होत नाहीत.

डोळे राहतात हेल्दी

कांद्याच्या पातीमध्ये ल्युटीन आणि जक्सॅथीन सारखे कारोटेनोइड असतात. ज्याने डोळे निरोगी राहण्यास मदत मिळते. यानेच डोळ्यांची दृष्टीही सुधारते. त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी तरी नियमित कांद्याच्या पातीचं सेवन करावं.

कॅन्सरचा धोका होतो कमी

कांद्याच्या पातीमध्ये एलिल सल्फाइड नावाचं शक्तीशाली सल्फर कम्पाउंड असतं. जे  कोलोन कॅन्सर रोखण्यात मदत करतात. याचे फ्लेवोनोइड्स तत्व जॅन्थीन ऑक्सिडेस एन्जाइमची शरीरात निर्मिती करते, ज्याने डीएनए आणि सेल्सचं होणारं नुकसान टाळता येतं.

शुगर लेव्हल कमी करेल

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कांद्याच्या पातीमधील सल्फर कम्पाउंड शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत करते. याने इन्सुलिनचं प्रमाण वाढून रक्ताच्या माध्यमातून बॉडी सेल्सपर्यंत शुगर चांगल्या प्रकारे पोहोचून चांगला रिझल्ट मिळतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य