शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विड्याचे पान खा, सर्दी-खोकला पळवा; आरोग्य, सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त, जाणून घ्या फायदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 15:50 IST

विड्याचे पान जेवणानंतर खाण्याची प्राचीन काळापासूनची परंपरा आहे.

Benefits Of Betal Leaves  : नागवेलीची पाने म्हणजे खाण्याचे पान किंवा विड्याचे पान. जेवणानंतर पान खाण्याची प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. आजीबाईच्या बटव्यातही विड्याच्या पानाचा आवर्जून समावेश असतो. विड्याच्या पानात अनेक गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

विड्याच्या पानाने तोंडाची चव वाढते, दुर्गंधी निघून जाते, सर्दी व खोकल्यावर विड्याचे पान गुणकारी आहे. विड्याचे किंवा नुसते पान चावून खाल्याने आतडे निरोगी राहतात. विड्याचे पान उष्ण असल्याने ते वात आणि कफ विकारांवर गुणकारी ठरते. 

सणासुदीच्या काळात विड्याच्या पानांना अधिक मागणी असते. चातुर्मास सुरू झाल्यावर दिवाळीपर्यंत अनेक सणवार असतात. पाने घरी पूजेसाठी आणि खाण्यासाठी सुद्धा आणतात. सध्या बाजारात नागवेलची पाने १०० रुपयांना ५० पाने असा दर आहे.

विड्याची पाने गुणकारी-

१) विड्याची पाने पोटांच्या विकारांवर गुणकारी असून, त्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. तोंडाची दुर्गंधी दूर होते. शरीरातील हनिकारक बॅक्टेरिया या पानाच्या सेवनाने कमी होतात.

२) विड्याच्या पानाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे. वात व कफ विकारांवर विड्याचे पान सेवन केल्याने चांगला लाभ होतो. मात्र, ज्यांना ऍसिडीटीचा त्रास आहे किंवा ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी या पानांचे सेवन करू नये. उन्हाळ्यातही विड्याची पाने कमी खावी. आपल्या प्रकृतीला विड्याचे पान योग्य की अयोग्य आहे याची खात्री करून विड्यांच्या पानांचे सेवन करावे. - डॉ. महेश अभ्यंकर, वैद्यकीय सल्लागार, औषध तज्ज्ञ

३) काही जणांच्या तोंडात बॅक्टेरिया संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या तोंडाला दूर्गंधी येते. त्यासाठी तोंडाची दूर्गंधी कायमस्वरुपी घालवण्यासाठी विड्याचे पान खावे असे तज्ज्ञ सांगतात. शिवाय नागवेलीच्या पानाचा विडा तयार करताना त्यामध्ये कात, चुना, बडीशेप आणि इलायची यांसारख्या घटकांचा समावेश असावा.

४) मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास होत असल्यास विड्याचे पान खावे. किंवा विड्याच्या पानांचा रस करून तो डोक्यावर चोळावा. लगेचच आराम मिळतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल