शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

पाठीच्या कण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात 'असे' भयंकर परिणाम, वेळीच सावध व्हा

By manali.bagul | Published: October 02, 2020 1:15 PM

How do spinal cord injuries affect body in marathi : अनेकदा चुकीच्या पद्धतीने दीर्घकाळ बसल्यामुळे पाठीच्या मणक्याला इजा पोहोचू शकते. याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर्स अॅण्ड स्ट्रोकच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे

माणसाचा कणा नेहमी ताठ असवा असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. स्वाभिमानाच्या बाबतीत  असं म्हटलं जातं. पण शरीराच्या बाबतीतही हे तितकंच खरं आहे. कारण नेहमीच निरोगी राहण्यासाठी तसंच वाढत्या वयात उद्भवत असलेल्या आजारांना दूर ठेवण्यासाठी पाठीचा कणा ताठ असण गरजेचं आहे. सध्या अनेकांना घरी बसून तासनतास काम करावं लागत आहे. त्यामुळे फारशी हालचाल होत नाही. अनेकदा चुकीच्या पद्धतीने दीर्घकाळ बसल्यामुळे पाठीच्या मणक्याला इजा पोहोचू शकते. इतकंच नाही तर पाठीच्या कण्यामध्ये गॅपसुद्धा पडू शकतो.

पाठ दुखीचा त्रास नाही किंवा पाठ दुखण्याची समस्या उद्भवत नाही असं क्वचित दिसून येतं. वयस्कर नाही तर तरूण अवस्थेतही व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पद्धत किंवा अपघात यांमुळे ही स्थिती उद्भवू शकते. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यास कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर्स अॅण्ड स्ट्रोकच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे.

 अशी असते रचना 

पाठीच्या कण्यांमध्ये मानेच्या भागात ७ मणके असतात. हा मणक्‍याचा भाग आपल्या माथ्याला आधार देतो. या मणक्‍यातील हालचालीमुळे माणसाला खाली बघून जमिनीवर काय आहे, ते पाहता येते. बसल्यानंतर किंवा उभं राहून एका खांद्याकडून दुसऱ्या खांद्यापर्यंत आणि पलीकडे नजर वळवता येते. मानेच्या खालच्या छातीच्या भागातील कण्यात फारशी  हालचाल होत नाही. या भागातील मणक्‍यांना फासळ्या लागून असतात. यांच्या खाली कमरेचा भाग येतो. छातीच्या भागात १२ मणके असतात, तर कमरेत ५ मणके असतात. हे पाच मणके माणसाचे वजन पेलण्यासाठी महत्वपूर्ण असतात. पाठीच्या कण्याला दुखापत किंवा गंभीर समस्या झाल्या वैद्यकिय परिभाषेत याला (एससीआय) spinal cord injuries असं म्हणतात. 

पाठीचा मणक्याला इजा झाल्यानं असा होतो परिणाम

पाठीच्या मणक्याला  दुखापत झाल्यास पोटावर आणि आतड्यांवरही काहीवेळासाठी परीणाम होतो. वैद्यकिय परिभाषेच या स्थितीला  ileus म्हणतात. आतड्यांचे काम व्यवस्थित सुरू नसल्याने पोटात आम्ल तयार होतं. हे आम्लद्रव बाहेर पडले नाही तर त्यामुळे अल्सर होण्याची भीती असते. घश्यासह शरीराला सूज येऊ शकते. याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ लोआ  हॉस्पिट्स अॅण्ड क्लिनिकच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. 

मोठ्या सर्विकल इंज्यूरिजमध्ये पचनक्रियेवरही परिणाम होतो.  अनेकदा घास गिळायला  त्रास  होतो. त्यावेळी  नाकातून नळीच्या साहाय्याने पोटात अन्न टाकले जाते. याशिवाय सीएसआयमुळे मूत्राशय आणि मेंदूमधील संदेश बदलू शकतो, जेव्हा मूत्राशय पूर्ण भरते तेव्हा मूत्राशयातील मज्जातंतू मूत्राशयात संदेश पाठवतात आणि मूत्रमार्गाची (मूत्रविसर्जन) करण्याची आवश्यकता दर्शवितात. एखाद्या दुखापतीनंतर मेंदूला संदेश पोहोचू शकत नाही. यावर उपाय म्हणून मुत्राशयाचा ताण कमी करण्यासाठी कॅथरेटरचा बाहेर काढले जाते आणि पुन्हा त्या ठिकाणी  रिप्लेस  केले जाते. अनेकदा सर्जरी करण्याची वेळही येऊ शकते.

त्वचा आपल्या शरीरासाठी संरक्षणात्मक आवरण आहे. रक्तदाब आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जास्त दबाव, उष्णता त्वचेत बिघाड होऊ शकतो. परिणामी स्किन अल्सर होतो. एससीआयनंतर शरीर त्वचेला होणार्‍या धोक्याबद्दल माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे शौचाला गेल्यानंतर, स्वच्छता करणं गरजेचं आहे.

एससीआयमुळे शरीराला  तीव्र किंवा अती तीव्र वेदना होऊ शकतात. मानेच्या हाडांना दुखापत झाल्यास मेंदूलावरही परिणाम होण्याची शक्यता असते. एकाग्रता, संवाद साधणं, स्मरणशक्ती या कार्यांमध्ये  अडथळा निर्माण होऊन व्यक्तीमत्वात नकारात्मक बदल होऊ शकतो. इतकंच नाहीतर यामुळे लैंगिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो.

तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा, लैंगिक समुपदेशन कार्यक्रमात सहभाग घ्या. आपल्या बसण्याची उठण्याची पद्धत चुकीची असल्यास आजच बदला, डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्या, जमेल तितका वेळ व्यायाम दरदरोज करण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेचिंग केल्यामुळे स्नायू चांगले राहतात, जास्तीत जास्त  पाणी प्या, प्रोटीन्स, व्हिटामीन्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. ताण तणावमुक्त आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य