अंगदुखी लगेच दूर करण्यासाठी आंघोळीची ही पद्धत वापरा, थकवाही लगेच होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 04:38 PM2022-12-21T16:38:29+5:302022-12-21T16:42:01+5:30

Health Tips : हा थकवा घालवण्यासाठी किंवा अंगदुखी दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला सर्वात सोपा आणि तुम्हाला आवडेल असा उपाय सांगणार आहोत.

Health Tips : How do herb bath reduce body pain and stress | अंगदुखी लगेच दूर करण्यासाठी आंघोळीची ही पद्धत वापरा, थकवाही लगेच होईल दूर!

अंगदुखी लगेच दूर करण्यासाठी आंघोळीची ही पद्धत वापरा, थकवाही लगेच होईल दूर!

Next

Health Tips : अलिकडे वाढलेला कामाचा ताण, प्रवासाचा वेळ, घरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे वाढलेलं प्रेशर याने व्यक्तीला अधिक मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. याचा परिणाम म्हणजे कमी वयातच वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. सतत अंगदुखी, थकवा, मूड नसणे अशाही समस्या होतात. आता हा थकवा घालवण्यासाठी किंवा अंगदुखी दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला सर्वात सोपा आणि तुम्हाला आवडेल असा उपाय सांगणार आहोत.

वेगळ्या पद्धतीने आंघोळ करा

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, थकवा आणि बॉडी पेन दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला आंघोळ करण्याचा सल्ला देत आहोत. पण ही आंघोळ तुम्ही रोज करता तशी अजिबात नाही. अंगदुखी, कणकण, आणि थकवा दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काही हर्बल टाकावे लागतील. याने तुमच्या तणाव, जळजळ आणि थकवा लगेच दूर होईल. 

कशी करावी आंघोळ?

- हर्ब बाथ करण्यासाठी तुम्ही कोणतेही हर्बल निवडू शकता. जसे की, लॅवेंडर, पेपरमिंट, रोजमेरी आणि ओवा. जर तुमच्याकडे हा गोष्टी लिक्विड स्वरूपात असतील तर हे २५ ३० मिली लिटर घ्या. पण जर हे हर्ब तुमच्याकडे ड्राय स्वरूपात असतील तर तुम्ही बकेटीत ३ ते ४ चमचे टाकू शकता. 

- जर तुमच्याकडे ड्राय हर्ब असतील तर तुम्ही एक लिटर पाण्यात ते टाका. हे पाणी उलडू द्या आणि नंतर २० मिनिटे तसंच राहू द्या. 

- आता हे पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात मिश्रित करा. हे लक्षात ठेवा की, जेव्हाही तुम्ही थकलेले असाल तेव्हा पाणी फार जास्त गरम घेऊ नका. आंघोळीचं पाणी कोमटच असावं. कारण याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढवण्यास आणि नर्ब्सना रिलॅक्स करण्याचं काम करतं.

दुसरा उपाय

एक लिटर पाणी घ्या आणि त्याला उकडी येऊ द्या. या पाण्यात लॅवेंडर किंवा लेमन असेंशिअल ऑइल मिश्रित करा. सोबतच ५ चमचे गुलाबजल मिश्रित करा. आता हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिश्रित करा. याने आंघोळ केल्यावर तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि अंगदुखीही दूर होईल. हे उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

तिसरा उपाय

आंघोळीच्या पाण्यात थोडं सेंधं मीठ घातल्यास याने त्वचेचं ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि त्वचा आतून ग्लो व्हायला लागते. एक बकेट पाण्यात एक चमचा सेंधं मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करा. तसेच जास्तीत जास्त लोक हे मीठ केवळ खाण्यातच वापरतात, पण मीठ जर पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील.

यात आढळणाऱ्या मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वांमुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. तसेच रोज या आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसांमध्ये डॅड्रफही होणार नाही.

Web Title: Health Tips : How do herb bath reduce body pain and stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.