शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जेवताना जास्तीत जास्त लोक करतात ही चूक, वेळीच व्हा सावध नाही तर पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:10 IST

Health Tips : सामान्यपणे सकाळी शाळा-कॉलेज किंवा ऑफिसला जाताना उशीर होऊ नये म्हणून लोक जेवणाला योग्य वेळ देऊ शकत नाहीत आणि घाईघाईत ब्रेकफास्ट किंवा जेवण संपवतात.

Health Tips : जेवण करणं ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या क्रियांपैकी एक आहे. वेगवेगळ्या देशात जेवणाची वेगवेगळी पद्धत असते. काही लोक लग्नात उभं राहून जेवतात तर काही लोक घरी किंवा हॉटेलमध्ये डेबलवर बसून जेवतात. अनेक ठिकाणी मांडी घालून खाली बसून जेवण्याची पद्धत फार कमी होत चालली आहे. पण असं करणं आरोग्यासाठी फार घातक ठरू शकते. एका सर्व्हेनुसार, उभं राहून जेवणं करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. ते कसं हे जाणून घेऊ.

सामान्यपणे सकाळी शाळा-कॉलेज किंवा ऑफिसला जाताना उशीर होऊ नये म्हणून लोक जेवणाला योग्य वेळ देऊ शकत नाहीत आणि घाईघाईत ब्रेकफास्ट किंवा जेवण संपवतात. रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती उभं राहून जेवण करत असेल तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याच्या शरीरातील काही ग्रंथी काम करणं बंद करतात आणि ती व्यक्ती सतत तणावात राहू शकते. जेव्हा आपण उभे राहून जेवण करतो तेव्हा अन्न पचायला वेळ जास्त लागतो आणि घाईघाईत आपण जास्त जेवण करतो.

उभं राहून किंवा चालता-फिरता खाऊ नका

नेहमीच बघितलं असेल की, लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात लोक उभे राहूनच जेवण करतात. तुम्हीही असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा. मुळात उभं राहून जेवण करताना तुम्हाला भूकेचा अंदाज लागत नाही आणि अशात तुम्ही जास्त खाता. असं केल्याने तुमचं वजन वाढू लागतं.

खाली बसून जेवण्याचे फायदे

खाली बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर बॉडी पोश्चर सधारतो. खाली बसून जेवण केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला राहतो. क्रॉस-लेग्स म्हणजे मांडी घालून बसल्याने नसांमधील तणाव दूर होतो. त्यामुळे रोज खाली बसून जेवण केलं तर  तुम्हाला फायदाच होईल. सोबतच खाली बसून जेवणं पाठीसाठी चांगलं आहे.

उभं राहून जेवण केल्याने शरीराचं पॉश्चर बिघडतं. जेव्हा आपणं उभे राहून जेवण करतो तेव्हा फार जास्त वाकतो, तसेच स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी शरीराच्या कोणत्याही एका भागावर जास्त जोर देतो. जर रोजच आपण असं केलं तर याचा प्रभाव पाठीच्या कण्यावर पडू शकतो.

पचनक्रिया बिघडते

घाईघाईने जेवण केल्याने पचनक्रिया खराब होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शरीरात फॅट वाढू लागतं आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ लागता. त्यामुळे खाली बसून मांडी घालून जेवण कराल तर तुमचा फायदा आहे. बसून जेवल्याने पोट लवकर भरतं. अशात वजन कंट्रोल करण्याच्या उद्देशाने असं करणं फायदेशीर आहे. त्यामुळे वेळीच तुमच्या सवयी बदला.

गॅस होतो

पोटात अनेक कारणांमुळे गॅस तयार होतो. त्यातील एक कारण असतं घाईघाईने जेवण करणे. अशा स्थितीत अन्न पचवणं अवघड होतं. त्यामुळे पोटात जडपणा, गॅस अशा समस्या जाणवू लागतात. त्यामुळे जेवण नेहमी हळू आणि बसून करावं.

कंझूमर रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात सांगण्यात आले आहे की, आपलं वेस्टिबुलर सेंस कशाप्रकारे सेंसरी सिस्टमवर प्रभाव टाकतं. अमेरिकेतील साउथ फ्लोरिडा यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर दीपायन विश्वास यांच्या नेतत्वात करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, गुरूत्वाकर्षण शरीराच्या खालच्या भागात रक्त वेगाने खेचतं, ज्यामुळे हृदयाला रक्त पुन्हा वर खेचण्यासाठी जास्त वेगाने काम करावं लागतं आणि तेव्हा हृदयाची गती वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य