शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर

By manali.bagul | Published: February 10, 2021 1:29 PM

Health Tips in Marathi :पोट साफ होत नसल्यास काय करावे? जर सकाळच्यावेळी पोट साफ झालं  नसेल तर दिवसभर पोट फुगणं, गॅस होणं,(Stomach Pain) पोटात कळा येणं (Bloating) असा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

बदलत्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, दिवसभर एकाच जागी बसून राहणं, व्यायाम न करणं यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडून येत असतो. त्यामुळे पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर सकाळच्यावेळी पोट साफ झालं  नसेल तर दिवसभर पोट फुगणं, गॅस होणं,(Stomach Pain) पोटात कळा येणं (Bloating) अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गरोदरपणातही काही औषधांच्या सेवनानं ही समस्या वाढत जाते.

या कारणांमुळे पोट साफ होत नाही

जगभरातील  १६ ते २० टक्के लोकांना पोट साफ न होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. सध्याच्या घडीला अमेरिकेतील  २० टक्के लोकसंख्या या समस्येचा सामना करत आहे. आज आम्ही तुम्हाला याची कारणं सांगणार आहोत.

-रोजच्या आहारात फायबर्सचे (Fiber Deficiency), प्रमाण कमी असणं, दूध, चीझ, मटण अशा पदार्थांचे अतिसेवन करणं

- डिहाइड्रेशन (Dehydration) म्हणजेच शरीरात योग्य प्रमाणात पाण्याचा समावेश नसणं

- व्यायाम न करणं, दिवसभर एकाचजागी बसून राहणं

- हाय कॅल्शियम एंटॅसिड (Antacid) औषधांचे सेवन

-प्रवास केल्यानंतर किंवा रोजच्या रुटीनमध्ये बदल झाल्यानंतर 

होणारे आजार

नियमित पोट साफ न होण्याच्या  समस्येकडे दुर्लक्ष केल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो

मुळव्याथ

मोठ्या आतड्यांना सूज येणं

आतडे आणि ओटी पोटाशी निगडीत आजार

पोटाचा अल्सर

इरिटेबल बाउल सिंड्रोम (आईबीएस)

उपाय

मनुके ग्लासभर दुधात घालून दूध उकळ वावे. रात्री झोपताना त्या चावून खाव्यात त्यावर गरम दूध प्यावे. असे केल्यास  बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

जिरं पचनासाठी खूप चांगलं असतं. भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर ताकात मिसळून प्या. यामुळे गॅस, अपचनापासून सुटका होईल.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर असते. यामुळे बिघडलेली पचनशक्ती सुधारून अन्नपचन योग्य पद्धतीने होते. शारीरिक क्रिया सुरळीत होण्यात मदत होते. त्यासाठी तुम्ही नाष्त्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी खाऊ शकता.

पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. काहीवेळातच गॅसची समस्या दूर होते.  रात्रीचं जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल तर पुदिन्याची ताजी पाने चावून खा. तसेच पुदिन्याची पाने घातलेला चहा प्या. यामुळे पचनक्रियेशी संबंधित तक्रारीत आराम मिळतो. शक्यतो रात्री भाताचा आहारात समावेश करू नका. त्यामुळे तुम्हाला शरीर जड झाल्यासारखं वाटणार नाही.

उन्हाळ्यात  खालेल्या अन्नाचं पचन मंद गतीने होतं असतं. गरजेपेक्षा जास्त आहाराचं सेवन करणं टाळा. एकाच वेळी भरपेट न जेवता. ठराविक अंतरानं थोडं थोडं खाण्याची सवय लावून घ्या. तेलकट, मेदयुक्त पदार्थ,  खारट, जंकफूडचं सेवन करणं टाळा. साखर, हवाबंद डब्यातील पदार्थ, मसालेदार पदार्थ खाऊ नका. खासकरून मैद्याचे पदार्थ खाऊ नका. लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

चणे आणि गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबरर्स असतात. त्यामुळे पचक्रिया चांगली राहते पचनास आवश्यक असणारे घटक त्यात असतात. त्यामुळे चणे आणि गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं. ज्या लोकांना पोट साफ न होण्याची समस्या जाणवत असते अशा लोकांनी जर चणे आणि गुळाचे  सेवन केले तर पोट साफ होते. अपचनाचा त्रास होत नाही. सावधान! 'या' ५ सवयींमुळे वेळेआधीच येऊ शकतं म्हातारपण; आजच बदला चुकीच्या सवयी

याशिवाय नियमित व्यायाम किंवा योगा केल्यास ही समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. दिवसभरातून जवळपास ७ ते ८ ग्लास पाणी प्यायलाच हवे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य