शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अपचन, सर्दी- खोकल्याने त्रस्त? आहारात गरम मसाला वापरा; आठवडाभरात दिसेल फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:07 IST

भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा गरम मसाला हा फक्त स्वाद आणि रंगासाठीच नसतो तर गरम मसाल्याचा उपयोग आरोग्यासाठीही  होत असतो. 

Benefits of Of Garam Masala : भारतात वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जेवण बनवण्याची पद्धतीही भिन्न आहेत. शिवाय भारतीय खाद्य संस्कृतीमधील सर्वात खास बाब म्हणजे येथील मसाले. त्यातही जेवणाचा स्वादिष्ट आणि रुचकर बनवण्यासाठी गरम मसाले उपयुक्त ठरतात. पण भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा गरम मसाला हा फक्त स्वाद आणि रंगासाठीच नसतो तर गरम मसाल्याचा उपयोग आरोग्यासाठीही  होत असतो. 

आहारात गरम मसाल्याचा समावेश केल्यास पचनसंस्थेला अनेक फायदे मिळू शकतात. जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये आवश्यक आहे. हे केवळ भूकच वाढवत नाही तर गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यातही मोठी भूमिका बजावते. गरम मसाल्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे ते तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यात मदत करते.

गरम मसाले खाण्याचे फायदे-

शरीराच्या एकूण आरोग्याला चालना देण्यासाठी हे खूप खास मानले जाते. 

१) गरम मसाला चयापचय वाढवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. काळी मिरी, लवंग आणि जिरे यांच्या मदतीने शरीरातील अनेक अवयवांना फायदा होतो आणि शरीरातील अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होते. 

२) बदलत्या ऋतूंमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी गरम मसाला देखील खूप उपयुक्त आहे. हे तुम्हाला आजार आणि संक्रमण टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती देते, तर सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील याचे सेवन खूप प्रभावी मानले जाते.

३) गरम मसाल्यांमुळे पचनक्रिया सुधारून शरीरात गॅस्ट्रिक ज्यूस रिलिज करण्यास मदत  करतात. शिवाय अपचनाची समस्या यामुळे दूर होते, असं आहारतज्ज्ञ सांगतात. एकंदरीत गरम मसाले डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी उत्तम ठरतात. यामुळे डायजेस्टिव्ह एंजाईम्स वाढतात आणि पोषक त्तव बाहेर येतात. इतकंच नाही तर ब्लोटिंगची समस्याही दूर होते. 

४) तोंडातून येणाऱ्या दुर्गंधावरही गरम मसाला फायदेशीर ठरतो. लवंग दातांच्या समस्यांसाठी फायदेशीर समजले जाते. लवंगामध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल