शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करायचंय? 'अ‍ॅपल टी'चे सेवन करा; तज्ज्ञांनी सांगितली नवी ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:35 IST

'अ‍ॅपल टी' एक भारी मॉर्निंग ड्रिंक! अ‍ॅपल टी प्यायल्याने शरीराला त्याचे अगणित फायदे मिळतात.

Health Tips : 'अ‍ॅपल टी' एक भारी मॉर्निंग ड्रिंक! अ‍ॅपल टी प्यायल्याने शरीराला त्याचे अगणित फायदे मिळतात. 'अ‍ॅपल टी' म्हणजे सफरचंद या फळापासून तयार केलेला चहा असतो. या खास चहाने वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित राहते.

वजन कमी होते-

सफरचंद चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यात खूप कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढण्याची तक्रार नसते. याशिवाय त्यात फॅटचे प्रमाणही खूप कमी असते. त्याचा थेट परिणाम वजन कमी होण्यावर दिसून येतो. 

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो-

रोज सफरचंद चहाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. यामध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स तुमच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करतात. सफरचंदाचा चहा पिऊनही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. या चहामुळे चयापचय संतुलन सुधारते. कारण त्यात अँटिऑक्सिडेंट तसेच फ्रुक्टोज असते, जी एक नैसर्गिक साखर आहे. सफरचंद चहाच्या मदतीने रक्तातील साखर वाढणे किंवा कमी होणे टाळता येते. लवंग, दालचिनी आणि इतर काही मसाल्यांच्या साहाय्याने तयार केलेला 'अ‍ॅपल टी' प्यायला चवदार तर लागतोच पण वजन कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे.

पचनक्रिया सुधारते-

सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात सापडते. सफरचंदापासून तयार केलेली चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते,असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. 

ब्लड प्रेशर कंट्रोल-

अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स व्यतिरीक्त अ‍ॅपलमध्ये नॅच्युरल शुगर अशते. जी मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा करण्यासोबतच ब्लड प्रेशर नियंत्रित करते. ब्लड प्रेशरमध्ये अचानक होणारी वाढ 'अ‍ॅपल टी'ने रोखली जाते. 

असा बनवा चहा-

अ‍ॅपलचा चहा तयार करण्यासाठी तुम्हाला १ अ‍ॅपल, ३ कप पाणी, १ चमचा लिंबाचा रस, २ टी बॅग आणि दालचीनी पावडरची या सामग्रीची गरज आहे. 

कृती-

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी आणि लिंबाचा रस टाका, नंतर त्यात टी बॅग टाका. काही वेळ या उकळी येऊ द्या. त्यानंतर कापलेले अ‍ॅपलचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकावे. जवळपास ५ मिनिटे हे उकळू द्या. त्यानंतर यात दालचीनी पावडर टाका. चहामध्ये मिश्रित दालचीनी डीटॉक्सिफाय करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइलWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स