शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

हृदयासंबंधी या गंभीर आजारात केळी खाणं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 12:38 IST

Banana Health Benefits : केळी केवळ वजन वाढवण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टीसाठी फायद्याची ठरतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, केळींचं नियमित सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनच्या रुग्णांना फायदा होतो. 

Banana Health Benefits :  केळी एक असं फळ आहे जे खायला स्वादिष्ट तर लागतच सोबत आरोग्यासाठीही वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे सिद्ध झालं आहे. केळी केवळ वजन वाढवण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टीसाठी फायद्याची ठरतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, केळींचं नियमित सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनच्या रुग्णांना फायदा होतो. 

१.८० कोटी लोकांचा हृदयरोगाने मृत्यू

हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशन एक अशी स्थिती आहे ज्यात तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपप्रवाह वेगाने आणि प्रेशरने होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुसार, २०१६ मध्ये जगभरात जवळपास १७.९ मिलियन लोक म्हणजेच १ कोटी ८० लाख लोकांचा मृत्यू कार्डिओवस्कुलर आजारांनी झाला होता. ही आकडेवारी जगभरात झालेल्या एकूण मृत्यूंच्या ३१ टक्के इतकी आहे. यात ८५ टक्के मृत्यू हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे झालेत. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आजारामागे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाइल आहे. 

केळीचे हाय बीपी असल्यास फायदे

केळ्यांमध्ये फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे एक्सपर्ट हायपरटेंशन आणि हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना चांगल्या आरोग्यासाठी केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यासोबतच केळीमध्ये सोडियम सुद्धा कमी प्रमाणात असतं. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना आहारातून सोडियमचा सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. केळीमध्ये असलेल्या पोटॅशिअम vasodilator चं काम करतो. याने सोडियमचा प्रभाव कमी केला जातो आणि यूरिनच्या माध्यमातून सोडियम शरीरातून बाहेर टाकलं जातं. 

जास्ते केळी खाल्ल्याने साइड इफेक्ट

केळी हे फळं खाणं सर्वात सोपं आहे. वेगवेगळ्या प्रकारे केळी खाता येते. केळीचे अनेक आरोग्यदायी फायदे असेल तरी काही दुष्परिणामही आहेत. जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने नुकसान होतं. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केळी खाव्यात.

केळी खाण्याचे इतर फायदे

१) केळी खाल्याने हृदय रोग दूर राहतात - केळी हृदय रोगाने ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात. नियमीत रुपाने केळी खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. या कारणाने केळी खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. तसेच यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्या कारणाने रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज दोन केळी खाणाऱ्यांना हृदय रोग आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होत नाही.

२) केळी खाल्याने डोकं शांत राहतं - तणाव किंवा डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्याने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. कारण केळींमध्ये प्रोटीन आणि अनेक अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोकं शांत करतात. 

३) ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल - केळीचं सेवन नियमीतपणे केल्याने ब्लड प्रेशर सामान्य राहतं. यात पोटॅशिअम आढळतं जे ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. तसेच याने हायपरटेंशनची समस्याही नियंत्रित राहते. 

४) लहान मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी फायदेशीर - लहान मुलांच्या विकासाठी केळी फार फायदेशीर आहे. केळीमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन आढळतात ज्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. त्यामुळे लहान मुलांना नियमीत केळी द्यायला हवीत. तसेच केळी वयोवृद्धांसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबर आढळतात जे वाढत्या वयात गरजेचे असतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य