ही आहेत डिप्रेशनची ६ लक्षणे, आनंदी राहूनही येत नाहीत लक्षात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 10:40 AM2018-07-19T10:40:51+5:302018-07-19T10:41:38+5:30

कॅन्सर, टीबी आणखीही काही आजारांना आपण जीवघेणे आजार समजतो. हे आजार झाल्याचे उघड झाल्यावर आपण वेगवेगळे उपाय करायला सुरुवात करतो.

Health Tips : 5 Depression Symptoms You Shouldn’t Ignore | ही आहेत डिप्रेशनची ६ लक्षणे, आनंदी राहूनही येत नाहीत लक्षात!

ही आहेत डिप्रेशनची ६ लक्षणे, आनंदी राहूनही येत नाहीत लक्षात!

Next

कॅन्सर, टीबी आणखीही काही आजारांना आपण जीवघेणे आजार समजतो. हे आजार झाल्याचे उघड झाल्यावर आपण वेगवेगळे उपाय करायला सुरुवात करतो. पण याशिवायही असे काही आजार आहेत जे दिसायला तर इतके मोठे नसतात पण हळूहळू व्यक्तीला मरणाच्या दारात घेऊन जातात. डिप्रेशन सुद्धा या जीवघेण्या आजारांपैकी एक आहे. 

हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे. हा आजार होण्याची कारणे तणाव आणि जास्त विचार करणे ही असू शकतात. आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींमुळे तणाव होणे, चिंता करणे, निराशा येणे, कोणत्याही व्यक्तीसोबत किंवा गोष्टीमध्ये इंटरेस्ट न घेणे, ही सगळी कारणे व्यक्तीमध्ये डिप्रेशन निर्माण करते. 

अनेकांना केवळ इतकच माहीत असतं की, निराशा आणि उदासी हेच डिप्रेशनचे संकेत आहेत. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, केवळ हेच डिप्रेशनचे संकेत नाहीयेत. आणखीही काही लक्षणे आहेत जे खालीलप्रमाणे सांगता येतील.

१) लवकर राग येणे

जर तुम्ही कोणत्याही छोट्या गोष्टीवरून चिडत असाल, तुमचा संताप होत असेल तर समजा की, तुम्ही डिप्रेशनच्या कचाट्यात सापडले आहात. एका अभ्यासात तणावाला राग, चिडचिड करणे याच्याशी जोडलं आहे. 

२) मद्याचे अधिक सेवन

जर्नल एडिक्शनच्या एका अभ्यासानुसार, जर तुम्ही रोज प्रमाणापेक्षा जास्त मद्याचं  सेवन करत असाल तर तुम्ही डिप्रेशनचे शिकार झाल्याचा हा संकेत आहे. भलेही एक ग्लास मद्याने तुम्हाला आराम मिळेल पण तिसरा ग्लास तुमच्यातील नकारात्मकता वाढवतो. 

३) सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे

जर्नल सायबरसायकॉलॉजी बिहेविअर अॅन्ड सोशल नेटवर्किंगनुसार, जे लोक त्यांच्या सोबतच्या लोकांना सोडून सतत सोशल मीडियावर असतात ते तणावाचे शिकार झाले आहेत. 

४) स्वप्नांमध्ये हरवून जाणं

एका अभ्यासानुसार, जेव्हा तुमचं लक्ष वर्तमानातील गोष्टींमध्ये असतं तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो. पण जेव्हा तुमचं लक्ष भरकटतं, म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्या गोष्टींचा विचार करू लागता तेव्हा तुम्हाला निराशा येते. 

५) निर्णय न घेऊ शकणे

जर तुम्हाला निर्णय घेण्यात अडचणी येत असतील, याने चिडचिड होत असेल तर तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात. एका अभ्यासानुसार, जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असता तेव्हा विचार करण्याची आणि समजण्याची क्षमतेवर प्रभाव पडतो. 

Web Title: Health Tips : 5 Depression Symptoms You Shouldn’t Ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.