HEALTH : कामावरुन घरी आल्यानंतरचा थकवा घालविण्यासाठी हे आहेत हेल्दी फुड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 12:22 IST2017-07-25T06:52:04+5:302017-07-25T12:22:47+5:30

दिवसभर कामाचा व्याप, जीवघेणी स्पर्धा यासाठी करावी लागणारी धावपळ यामुळे संधाकाळी घरी आल्यानंतर थकवा तर जाणवणारच.

HEALTH: These are the healthy foods to get tired after coming home from work! | HEALTH : कामावरुन घरी आल्यानंतरचा थकवा घालविण्यासाठी हे आहेत हेल्दी फुड !

HEALTH : कामावरुन घरी आल्यानंतरचा थकवा घालविण्यासाठी हे आहेत हेल्दी फुड !

ong>-रवींद्र मोरे 
दिवसभर कामाचा व्याप, जीवघेणी स्पर्धा यासाठी करावी लागणारी धावपळ यामुळे संधाकाळी घरी आल्यानंतर थकवा तर जाणवणारच. ही धावपळ सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्व्यांनाच करावी लागते. सेलिब्रिटींचे बिझी शेडूल्ड पाहता त्यांना तर खूपच धावपळ करावी लागते. त्यामुळे ते देखील संपूर्ण दिवसाच्या कामामुळे थकतात. मात्र त्यांच्या डायटमध्ये अशा काही फुड्सचा समावेश असतो, ज्यांच्या सेवनाने त्यांचा थकवा लगेच दूर होतो. आपणासही संध्याकाळी घरी आल्यानंतर थकवा जाणवत असेल तर खाली काही सुपर फुड्सची माहिती दिली आहे, ज्यांच्या सेवनाने आपला थकवा लगेच दूर होण्यास मदत होईल. 
 
Related image

* लिंबू वर्गीय फळांचा ज्यूस 
लिंबू वर्गीय फळ जसे संत्री, मोसंबीचा ज्यूस किंवा लिंबू पाणी घेतल्यास यातील विटॅमिन ‘सी’ मुळे कमजोरी दूर होऊ न शरीरास ऊर्जा मिळते.  

Image result for खजूर

* खजूर 
यात फ्रक्टोज आणि ग्लूकोज असल्याने संध्याकाळी घरी आल्यानंतर रोज किमान पाच खजूर खाल्ल्याने तात्काळ ऊर्जा मिळून थकवा दूर होईल.

Image result for * दही

* दही
दहीमधील कार्बाेहायड्रेट आणि फायबर हे थकवा दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे थक वा जाणवल्यास दहीचे सेवन करावे. 

Related image

* केळी
केळीमध्ये पोटॅशियम आणि विटॅमिन बी असल्याने इंस्टंट एनर्जीसाठी केळीचे सेवन करावे. 

Image result for * बादाम

* बदाम
यात विटॅमिन बी आणि रायबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बदामाचे सेवन केल्यास थकवा लगेच दूर होईल.

Image result for * कॉफी

* कॉफी
यातील कॅफिनमुळे मेंदू अ‍ॅक्टिव होतो. त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. 

Image result for * नारळ पाणी

* नारळ पाणी
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइड्स असते. त्यामुळे याच्या सेवनाने कमजोरी लगेच दूर होते. 

Image result for * सफरचंद ज्यूस

* सफरचंद ज्यूस
यात लोह आणि विटॅमिन सी असते. संध्याकाळी घरी आल्यानंतर हा ज्यूस घेतल्यास शरीरास ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. 

Image result for milk

* दूध
यात कॅल्शियम आणि प्रोटीन शरीराचा थकवा दूर करण्यास मदत करतात. यामुळे जेव्हाही थकल्यासारखे वाटल्यास दुधाचे सेवन करावे. 

Also Read : ​Fitness : बॉडी बनविण्यासाठी आहारात असावेत ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
                   : ​HEALTH : पावसाळ्यात संक्रमणापासून बचावासाठी करा ‘या’ विटॅमिनचा वापर !

Web Title: HEALTH: These are the healthy foods to get tired after coming home from work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.