HEALTH : वजन कमी करण्यासाठी हा आहे खास शाकाहारी डायट प्लॅन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 15:47 IST2017-07-29T10:17:01+5:302017-07-29T15:47:01+5:30
या डाएट प्लॅनसह योग्य पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे तुमचे काही किलो वजन नक्कीच कमी होईल.
.jpg)
HEALTH : वजन कमी करण्यासाठी हा आहे खास शाकाहारी डायट प्लॅन !
ब ्याचदा आपण वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित वजन कमी होत नाही. सेलिब्रिटींचे मात्र तसे नसते. त्यांनी जर ठरविले तर हवे तसे वजन कमी करु शकता आणि अपेक्षित वजन वाढवू शकता. यासाठी त्यांचा डायट प्लॅन परफेक्ट असतो. आपणासही जर खरंच मनापासून वजन कमी व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी शाकाहारी डाएट प्लॅन नक्की ट्राय करा. कारण शाकाहारी फूड खाण्यास चविष्ट असतातच पण त्याचसोबत त्यामुळे तुमचे वजन देखील कमी होऊ शकते. या डाएटसह योग्य पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे तुमचे काही किलो वजन नक्कीच कमी होईल.
* वजन कमी करण्यासाठी शाकाहारी डायट करणे का योग्य आहे
शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा व लठ्ठपणातील विकार जसे की मधूमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हार्ट अॅटक, काही प्रकारचे कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात असतो. काही शाकाहार घेणाऱ्या लोकांचे अतिवजन असू शकते पण संशोधनानूसार मांसाहार करणाऱ्यापेक्षा हे लोक १८ टक्कांनी बारीक असतात.
सर्वसाधारणपणे शाकाहारामध्ये नैसर्गिकरित्या फॅट व कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राखणे सोपे जाते. वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर व कॉम्लेक्स काबोर्हायड्रेट्स असल्यामुळे या आहाराच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न होतात व मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. शाकाहार घेणाऱ्या लोकांचे वजन तर कमी असतेच शिवाय अशा लोकांना कॅन्सर, मधूमेह, ह्रदयविकार व उच्च रक्तदाबाची समस्या देखील कमी होते.
चिकन ऐवजी मॉक मीट, बर्गर ऐवजी व्हेजी बर्गर व पनीर व अंड्याऐवजी टोफूचा आहारात समावेश करा. आपल्या आवडत्या भाज्यांमध्ये कमीतकमी क्रीम, लोणी व तूपाचा वापर करावा. नास्त्यासाठी अंडे न खाता ओट्स मध्ये बदाम व सोया दूध व ताजी फळे घालून खा. डिनर तयार करण्यासाठी बीन्स व पालक घालून व्हेजीटेबल पास्ता अथवा चायनीज नूडल्स अथवा थाय व्हेजीटेबल करी बनवा. तुमच्या आहारामध्ये फळे, भाज्या, तृणधान्ये, डाळी व सोयाबीनचा समावेश करा. या चविष्ट पदार्थांमुळे तुम्हाला शाकाहार करणे सोपे जाईल.
* वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्याल
आपल्या आहारात सर्व गोष्टी वनस्पतीजन्य घटकांपासून तयार करण्यात याव्यात. प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करावे. कांदा व लसूण शिवाय इतर सर्व भाज्या न सोलता खा. शक्य असल्यास सेंदीय पदार्थांचा आहारात समावेश करा. तसेच वजन घटवताना अवेळी लागणाºया भूकेवर मात मिळवण्यासाठी खास डाएट टीप्स जरुर करा.
* असा असावा डाएट प्लॅन
पहाटे अख्खी फळे (फळांचा रस नाही) खावीत. नाश्त्यामध्ये इडली-सांबर / पराठा-चटणी / भाज्या / पोहे / मुसली व दूध किंवा तृणधान्ये व न सोललेल्या भाज्यांपासून तयार केलेला कोणताही नास्ता. दुपारच्या जेवनात सलाड,पोळी/भात,डाळ,भाजीचा समावेश असावा. स्रॅक्समध्य स्प्राऊट चाट/ फळे असावीत आणि रात्रीच्या जेवनात व्हेजीटेबल सूप, पोळी/भात, डाळ, भाजीचा समावेश असावा.
Also Read : HEALTH : झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!
: Fitness : स्लिम आणि फिट राहण्यासाठी करा भरपूर नाश्ता !
source : thehealthsite