HEALTH : ...म्हणून उन्हाळ्यात खावी चिंच !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 09:41 AM2017-03-24T09:41:56+5:302017-03-24T15:14:34+5:30

चिंचेचे गुणधर्म भरपूर असून विशेषत: उन्हाळ्यात सेवन क रणे फायदेशीर ठरते.

HEALTH: ... so cough up in the summer! | HEALTH : ...म्हणून उन्हाळ्यात खावी चिंच !

HEALTH : ...म्हणून उन्हाळ्यात खावी चिंच !

Next
व ऐकताच तोंडाला पाणी आणणारी आणि स्वयंपाकघरात हमखास लागणारी चिंच आपणास माहित आहेच. चिंचेचे गुणधर्म भरपूर असून विशेषत: उन्हाळ्यात सेवन क रणे फायदेशीर ठरते. शिवाय पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत. पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं. 
चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर कुसकरून ते पाणी गाळून घ्यावं. पाणी अर्ध आटवावं. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा. हे सरबत रात्री प्याल्यानं सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार/सवय दूर होते. चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते. रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात. चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ २/२ या प्रमाणात घ्याव्या. 

Web Title: HEALTH: ... so cough up in the summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.