शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

CoronaVirus News : नॅशनल वर्क फोर्सचा दणका; कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 'या' औषधावर  बंदी, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 13:05 IST

CoronaVirus News & Latest Updates : दरम्यान काही दिवसांपूर्वी  (Drug Controller General of India)  डीसीजीआयने या औषधाच्या वापरासाठी परवागनी दिली होती.

गेल्या दोन ते  तीन महिन्यांपासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या १४ लाखांच्याही पुढे गेली आहे. नव्या आकडेवारी प्रमाणे देशात आतापर्यंत तब्बल १४ लाख ११ हजार ९५४  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारात आता नॅशनल वर्क फोर्सने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी इटोलिजुमाब या औषधाचा समावेश न करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी  (Drug Controller General of India)  डीसीजीआयने या औषधाच्या वापरासाठी परवागनी दिली होती. कोरोनाचं संक्रमण झालेल्या गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी आपातकालीन स्थितीत हे औषध वापरण्यासाठी परवागनी देण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाात औषधांची वाढती गरज लक्षात घेता रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी डिसीजीआयने रुग्णांच्या उपचारांसाठी इटोलिजुमाबला आपातकालिन स्थितीत वापरासाठी परवागनी दिली होती.

या औषधाचा उपयोग त्वचारोग सोरायसिसच्या उपचारांसाठी केला जातो. हे बायोकॉन कंपनीचे औषध आहे. कोविड 19 च्या श्वसनाची समस्या उद्भवत असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधाचा वापर  करण्याची मंजूरी देण्यात आली  होती. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनसार  या औषधाच्या प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून शुक्रवारी एका बैठकीत चर्चा झाली. या बैठकीतील अनेक तज्ज्ञांनी दिलेल्या मतानुसार कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी हे औषध कितपत योग्य ठरू शकतं याबाबत पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध २०१३ पासून प्लेक सोयारसिसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी एल्जुमाबी ब्रँण्ड इटोलिजुमाब हे औषध तयार करत आहे. 

बायोकॉनच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावर नॅशनल वर्क फोर्सला या औषधाबाबात अजून काही पुराव्यांची आवश्यकता आहे. कोविड 19 च्या उपचारांसाठी प्रोटोकॉलमध्ये  या औषधांचा समावेश करण्यासाठी आणखी माहिती प्राप्त केली जाणार आहे. देशभरात १०० पेक्षा रुग्णांवर या औषधाचा वापर केल्याने रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले होते.  कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. रेमडिसीवीर, डेक्सामेथासोन्स यांसह इतर औषधं कोरोना रुग्णांच्या उपचारात प्रभावी ठरत आहेत.  

Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?

कोविड19 वर स्वस्त उपचार शोधण्यात हा देश सगळ्यात पुढे; चाचणीदरम्यान 'या' औषधानं केली कमाल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicineऔषधं