शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

CoronaVaccine: प्रतीक्षा संपली! देशात पुढच्या महिन्यात येऊ शकते मुलांची कोरोना लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 14:58 IST

मंगळवारी संसद भवनात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात खासदारांना माहिती दिली. यादरम्यान, मुलांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत लस येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच, एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. देशात मुलांसाठी ऑगस्टपर्यंत कोरोना लस (Vaccine) येण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. (Health minister statement about Corona vaccine for children in August)

मंगळवारी संसद भवनात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात खासदारांना माहिती दिली. यादरम्यान, मुलांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत लस येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अद्यापही जाणवत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ही लस आलीच, तर ही दिलासादायक गोष्ट असेल. 

Corona Vaccine : कोरोनाच्या संकटात Relianceचं मोठं पाऊल; 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित, 10 लाख लोकांचं केलं लसीकरण

देशात सध्या 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनाच कोरोना लस देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवरही बघायला मिळाला आहे. तिसऱ्या लाटेत ही संख्या वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुलांसाठीच्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या लसींवर काम सुरू -भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. याचा अंतिम निकाल ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. याशिवाय, जायडस कॅडिलाच्या मुलांच्या लसीची ट्रायल पूर्ण झाली आहे. अशात लवकरच हिलाही मंजुरी मिळू शकते. तसेच फायझर, मॉडर्ना सारख्या लसींचेही काम सुरू आहे.  

तीन टप्प्यांत चाचणीलहान मुलांवर त्यांच्या वयानुसार लसीची तीन टप्प्यांत चाचणी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८, तर दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींची मुलांवरील चाचणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यापूर्वी केंद्र सरकारनं उच्च न्यायालयाला दिली होती. 

Corona Vaccination: भयानक! गप्पांमध्ये रमलेल्या नर्सनी महिलेच्या दोन्ही दंडावर टोचली कोव्हिशिल्ड लस, पुढे जे घडले... या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा -भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते म्हणाले.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य