HEALTH : भीतीदायक स्वप्ने येणे हा देखील एक आजार आहे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 16:59 IST2017-02-01T11:28:12+5:302017-02-01T16:59:46+5:30
झोपतेवेळी बऱ्याचदा कित्येक लोक भीतीदायक स्वप्नांमुळे घाबरुन अचानक जागे होतात. लहान मुलं तर एकदम उठून घाबरलेल्या अवस्थेत थरकाप करुन रडताना दिसतात.

HEALTH : भीतीदायक स्वप्ने येणे हा देखील एक आजार आहे !
झोपतेवेळी बऱ्याचदा कित्येक लोक भीतीदायक स्वप्नांमुळे घाबरुन अचानक जागे होतात. लहान मुलं तर एकदम उठून घाबरलेल्या अवस्थेत थरकाप करुन रडताना दिसतात. असे कधीतरी होणे सामान्य असते मात्र वारंवार होणे याला नाइटमेयर डिसआॅर्डर म्हटले जाते. वैद्यकीयदृष्ट्या हा एक प्रकारे मानसिक आजार आहे. ज्याचा उपचार योग्यवेळी होणे गरजेचे आहे.
आयुष्यात कधी ना कधी सर्वांना वाईट स्वप्ने येतात जे थोडा काळ किंवा पूर्ण दिवस लक्षात राहतात. मात्र असे स्वप्नं जर वारंवार येऊन झोपतेवेळी भीती वाटत असेल हा एक मानसिक विकार म्हणून उद्भवयास येतो. याला नाइटमेयर डिसआॅर्डर किंवा पेरासोम्नियादेखील म्हटले जाते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना ही समस्या होऊ शकते. अशा स्वप्नांमुळे झोप मोड तर होतेच शिवाय भीती, ह्रदयाचे ठोके वेगवान होणे आणि लांब-लांब श्वास घेण्यासारख्या समस्या निर्माण होतात. असे काही सेकंदापासून ते मिनिटांपर्यंत झाल्यानंतर सामान्य होते.
* मुख्य कारण
या डिसआॅर्डरचे कित्येक कारणे आहेत. जसे स्लीप अॅनिमिया, अपुरी झोप, भीतीदायक चित्रपट, कांदबरी, पुस्तके आदी पुन्हा-पुन्हा पाहणे किंवा वाचणे, जीवनात काही अनिष्ट घटना घडणे, कायम तणावात राहणे किंवा डिप्रेशनमध्ये राहिल्यानेही भीतीदायक स्वप्ने येतात. मद्यसेवन व धूम्रपानची सवयीनेही असे होते. कित्येकदा या सवयीला सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यानही अशी स्वप्ने येतात.
काय कराल?
जर एक आठवड्यापेक्षा जास्त किंवा सतत भीतीदायक स्वप्ने येत असतील तर डॉक्टर पॉलिसोम्नोग्राफी टेस्ट करतात. यात झोपेदरम्यान शरीरात होणारे बदलांवर लक्ष ठेवले जाते. उपचारात अॅँटीडिप्रेशन औषध दिले जाते आणि नशा आणणाºया पदार्थांपासून परावृत्त केले जाते.