Health : नैराश्य आलय? खेळा व्हिडिओ गेम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 18:25 IST2017-05-17T12:55:25+5:302017-05-17T18:25:25+5:30
बदलत्या जीवनशैलीच्या प्रभावाने बहुतांशजण नैराश्येच्या जाळ्यात सापडलेले आहेत. यातील काहीजण तर आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात..

Health : नैराश्य आलय? खेळा व्हिडिओ गेम !
ब लत्या जीवनशैलीच्या प्रभावाने बहुतांशजण नैराश्येच्या जाळ्यात सापडलेले आहेत. यातील काहीजण तर आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात. नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी अनेक उपायदेखील केले जातात, मात्र सकारात्मक परिणाम काहीअंशीच दिसून येतो. मात्र नव्या संशोधनानुसार संशोधकांनी एक प्रभावी उपाय शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजे व्हिडिओ गेम होय. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबतचे संशोधन केलं आहे. या संशोधनातून मिळालेल्या निष्कषार्तून डॉक्टरांनी हा सल्ला दिला आहे. संशोधकांच्या टीमने जैविक कारणांमुळे घडणाºया मानसिक बदलांना नैराश्येचं मुख्य कारण सांगितलं आहे. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींना व्हिडिओ गेमवर आधारित अॅप त्यांच्या मेंदूला प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात आलं. यानंतर त्यांच्या नैराश्येवर नियंत्रण मिळवता येत असल्याचं आढळून आलं.
याबाबत माहिती देताना, विद्यापीठाच्या सुबुही खान म्हणाल्या की, ‘सावधगिरीने तयार करण्यात आलेले प्रेरक संदेशाच्या उपयोगातून नवा संदेश मिळतो. हा संदेश मानसिक आरोग्यासाठी व्हिडिओ गेम अधिकाधिक व्यवहारी पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकत असल्याचं सुचवतो.’
पण असे असले तरी नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी व्हिडिओ गेमच्या वापराचा प्रभाव तात्विक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यातून दीर्घकालिन परिणाम साध्य होत नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉक्टरांचा हा शोध ह्यकॉम्प्यूटर्स इन ‘मन बिहेविअर’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
Also Read : World Health Day 2017 : डिप्रेशनशी लढताना "या" ५ गोष्टी कराच !