शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 10:44 AM

चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 

अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ फरेराच्या संशोधकर्त्यांनुसार, वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 

या अभ्यासात 1,078 हाय ब्लड प्रेशर ग्रस्त लोकांना सहभागी करुन घेतले होते. हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. शोधकर्ते म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 

वेगाने चालण्याचे फायदे -

अमेरिकन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार चालण्याचे तुम्हाला खालील फायदे होतात. 

1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.8)  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.10)  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत11)  चालण्यामुळे झोपही चांगली लागते.12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.13)  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम14)  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.16)  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.17)  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.18)  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.22)  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.23)  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.24)  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.25)  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.27)  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.28)  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते29)  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.30)  नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.31)  कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. आपण आपल्या नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स