शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, जाडेपणावर रामबाण उपाय ठरतो हरभरा, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 16:34 IST

Benefits green Chickpeas : जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर हरभरा खाणे फायद्याचे ठरेल. चला जाणून घेऊ हरभरा खाण्याचे आणखीही काही आरोग्यदायी फायदे...

Benefits green Chickpeas  :  तुम्ही काळे चणे किंवा फुटाण्यांचे फायदे अनेकदा ऐकले असतील, पण काय तुम्हाला हरभरा खाण्याचे फायदे माहीत आहेत? हरभरा चवीला स्वादिष्ट लागण्यासोबतच आरोग्यासाठीही चांगला असतो. हरभऱ्याचा उपयोग वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, फॅट, फायबर, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट आणि आयर्नसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे चणे खाल्याने एनर्जी मिळते. त्यासोबतच याने हाडेही मजबूत होतात. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर हरभरा खाणे फायद्याचे ठरेल. चला जाणून घेऊ हरभरा खाण्याचे आणखीही काही आरोग्यदायी फायदे...

१) हृदय चांगलं राहतं

जर तुम्ही रोज हरभरा खाल तर तुमचं हृदय निरोगी राहील. याच्या नियमीत सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. त्यामुळे तुमचं हृदय निरोग आणि चांगलं राहतं. 

२) ब्लड शुगरवर नियंत्रण

आजकाल अनेकांना ब्लड शुगरची समस्या असते. जर तुम्ही एक आठवडा अर्धी वाटी हरभरा खाल्यास तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकतं. 

३) शारीरिक कमजोरी होते दूर

हरभऱ्यामध्ये प्रोटीन आणि मिनरल्ससोबतच व्हिटॅमिनही अधिक प्रमाणात आढळतात. हे खाल्याने तुमच्या शरीराची कमजोरी दूर होते आणि तुम्हाला एनर्जी मिळते. 

४) आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव

हरभऱ्यामध्ये फायबर्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात, जे आतड्यातील बेकार बॅक्टेरियाला नष्ट करतात. आणि आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव करतात. 

५) हाडे मजबूत होतात

हरभऱ्यांमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात. रोज नाश्त्यात याचे सेवन केल्यास तुमची हाडे आणखी मजबूत होऊ शकतात. 

६) पचनक्रिया सुधारते

एक वाटी हरभरा रोज खाल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. याने तुमची पचनक्रिया सुधारते.

७) त्वचेवर ग्लो येतो

हरभऱ्यांमध्ये क्लोरोफिलसोबतच व्हिटॅमिन ए, इ, सी, के आणि बी कॉम्प्लेक्स आढळतात. या तत्वांचे त्वचेला खूप फायदे आहेतय त्यामुळे चणे खाल्यास त्वचेवर ग्लो येतो.

८) वजन कमी करण्यास मदत

जर हरभरा तुम्ही नियमीत खाल्ला तर तुमचं पोट भरलेलं राहिल. त्यामुळे तुमचा ओव्हर डाएटपासून बचाव होतो. याप्रकारे तुम्ही सहजतेने तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. 

९) वाढतं वय दिसत नाही

हरभऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असण्यासोबतच अॅंटीऑक्सिडेंट्सही आढळतात. याने वेगवेगळ्या आजारांना तुम्ही दूर ठेवू शकता आणि तुमचं वाढतं वयही दिसून पडत नाही.

१0) रक्त वाढतं

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आजच हरभरा खाण्यास सुरुवात करा. हरभऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे याच्या नियमीत सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य