शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Mosambi Juice Benefits: उन्हाळ्यात मोसंबीच्या ज्यूसपासून मिळतात अनेक फायदे, सौंदर्यही खुलतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 14:33 IST

Mosambi Juice Benefits: मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे.

Mosambi Juice Benefits:  उन्हाळ्यात गरमीपासून सुटका मिळवण्यासोबत लोक वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन करतात. डॉक्टरही या दिवसात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी वेगवेगळे पेय पिण्याचा सल्ला देतात.  यात मोसंबीच्या रसाचाही समावेश आहे. केवळ उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळीही मोसंबीच्या रसाचे अनेक आरोग्यादायी फायदे होतात. 

मोसंबीच्या रसाने शरीर थंड राहतं. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी पौष्टिक, पाचक, हृदयासाठी चांगली आणि रक्तसुधारक आहे. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी, अन्न पदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. 

- पचनक्रिया चांगली राहण्यासाठीही मोसंबीचा रस फायदेशीर आहे. आपल्या सुंगधाने आणि अॅसिडमुळे मोसंबीचा रस पचनक्रिया चांगली ठेवतो. 

- रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त संचार योग्यप्रकारे होतो. मोसंबीचा रस आपली रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवते. याने अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती मिळते. 

- मोसंबीमध्ये कॅलरीजचं प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे याचा वजन कमी करण्यातही मदत होते. मोसंबीचा रस मधासोबत प्यायल्यास वजन कमी होऊ शकतं. 

- डोळ्यांसाठीही मोसंबीचा रस फायदेशीर मानला जातो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब टाकून डोळे धुतल्यास कोणत्याही इन्फेक्शनपासून तुम्हाला आराम मिळेल. 

- मोसंबीचा रस चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स आणि काळे डाग निघून जातील. मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त शु्द्ध होतं. यामुळे त्वचेचा रंगही उजळतो. 

-मोसंबीचा रस पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबाची सालही वातहारक असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य