पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून लांब राहण्यासाठी जेष्ठमधाचं सेवन ठरेल गुणकारी; वाचा आणखी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:13 PM2020-07-29T17:13:00+5:302020-07-29T17:17:32+5:30

शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि उर्जा वाढवण्यासाठी काही पदार्थाचे सेवन करण्याची आवश्यकता असते.

Health benefits of mulethi in rainy season to protect from infection | पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून लांब राहण्यासाठी जेष्ठमधाचं सेवन ठरेल गुणकारी; वाचा आणखी फायदे

पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून लांब राहण्यासाठी जेष्ठमधाचं सेवन ठरेल गुणकारी; वाचा आणखी फायदे

googlenewsNext

पावसाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. साथीच्या आजारापासून बचाव करायचा असल्यास आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. कोरोनाच्या माहामारीत साधा ताप, सर्दी खोकला झाला असेल तरी लोक घाबरतात. कारण  कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरूवातीची लक्षणं तशीच आहेत. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि उर्जा वाढवण्यासाठी काही पदार्थाचे सेवन करण्याची आवश्यकता असते.

भारतीय मसाल्यांच्या पदार्थांमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात. आज आम्ही तुम्हाला जेष्ठमधाच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत.  ज्येष्ठमधाला यष्ठीमध अथवा मुलेठी या नावाने ओळखळलं जातं. ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसारायजक अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, अँटिबायोटिक तत्व असतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

ताप येणं

तापावर आयुर्वेदिक औषध हे नेहमीच गुणकारी ठरते. त्यातही ज्येष्ठमधाची पावडर, मनुका, मोहाचे फूल, वाळा, त्रिफळा हे सर्व मिक्स करून समप्रमाणात कुटून घ्या. रात्रभर गरम पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळे लगेच आराम मिळेल. 

अॅसिडीटी

खाण्यात वेगवेगळे पदार्थ आल्यामुळे अॅसिडीटीची समस्या उद्भवते. अनेकदा पचनशक्ती मंदावल्याने हा त्रास जास्त होतो. यासाठी तुम्ही ज्येष्ठमध चूर्णासह मध, आवळा पावडर आणि तूप मिक्स करून मिश्रण बनवा. या मिश्रणाचे सेवन केल्यास अॅसिडीटीची समस्या कमी होईल. 

घसा दुखी 

घसा दुखत असेल किंवा सर्दी, खोकल्याची समस्या  जाणवत असेल तर ज्येष्ठमध चघळ्याचा सल्ला दिला जातो.  तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे अशा समस्यांसाठी ज्येष्ठमध गुणकारी ठरते.  ज्येष्ठमधाचा काढा तयार करून प्यायल्यास आराम मिळतो. 

त्वचा रोगांसाठी गुणकारी

त्वचारोगातही ज्येष्ठमध लाभकारी आहे. त्वचेवर पुटकुळ्या येत असल्यास त्यावर ज्येष्ठमध उगाळून घेऊन त्याचा लेप लावल्याने मुरुमं कमी होण्यास मदत होते. यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. तरीही आरोग्यासंबंधी समस्या उद्भवल्यास जेष्ठमधाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...

'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

Web Title: Health benefits of mulethi in rainy season to protect from infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.