उपवास करणं शरीरासाठी फायद्याचं की तोट्याचं? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:37 PM2021-09-07T17:37:20+5:302021-09-07T17:45:10+5:30

श्रावणातील सण म्हटले म्हणजे उपवास हा आलाच. प्रत्येक सणानुसार त्या-त्या उपवासाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण उपवासाचं महत्त्व केवळ धार्मिक नसुन शारिरीकही आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच उपवासाचा आपल्या शरीराला काही फायदा होतो का?

health benefits of fasting, know if fasting is good for your health or not | उपवास करणं शरीरासाठी फायद्याचं की तोट्याचं? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या उत्तर

उपवास करणं शरीरासाठी फायद्याचं की तोट्याचं? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या उत्तर

googlenewsNext

श्रावणातील सण म्हटले म्हणजे उपवास हा आलाच. प्रत्येक सणानुसार त्या-त्या उपवासाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण उपवासाचं महत्त्व केवळ धार्मिक नसुन शारिरीकही आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच उपवासाचा आपल्या शरीराला काही फायदा होतो का? द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या वेबसाईटला दिलेल्या माहितीत तज्ज्ञांनी उपवास करणं शरीरासाठी फायद्याचं की तोट्याचं याचं उत्तर दिलं आहे...

होलिस्टिक लाइफस्टाइल कोच ल्यूक कुटिन्हो म्हणतात, 'सर्व धर्मांमध्ये उपवासाला महत्त्व आहे. आरोग्यासाठी आणि अध्यात्मासाठीही उपवास महत्त्वाचा आहे. उपवास म्हणजे उपाशी राहणं किंवा स्वत:ची भूक मारणं नव्हे. तर उपवास म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पोटाला आराम देणं आणि शरीराला पुन्हा उर्जा प्राप्त करुन देणं. शरीरातील विषारी द्रव्य यामुळे बाहेर पडतात.''

अनाहत ऑरगॅनिकच्या संस्थापिका राधिका अय्यर तलाती यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओपोस्ट करत उपवासाबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणतात,  'उपवासाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तर त्याचा उपयोग होतोच; पण मेंदू अधिक तल्लख होतो. मी गेल्या ११ वर्षांपासून उपवास करते. त्यामुळे माझं वजन अनेक किलोग्रॅम्सनी कमी करण्यात मी यशस्वी झाले.  माझी पचनशक्ती सुधारली तसेच माझ्या त्वचेवरील अॅलर्जीपासुनही मला सुटका मिळाली. माझ्या चेहऱ्यावर आलेलं तेज आणि चमकदार केस यामागे उपवास हेच कारण आहे.'

त्या पुढे असंही म्हणाल्या की, ' मी पाहिलंय की, अनेक जण फक्त कंटाळा येतो किंवा बोअर होतं म्हणून खात राहतात. अशा अनेक व्यक्तींना मी काही काळ उपवास करण्यासाठी मोटीवेट केलं आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यामुळे बदल घडून आला आहे,' 

तर, कोटिन्हो म्हणाल्या, 'उपवास सगळ्यांनाच फायदेशीर ठरतो असं नाही. तसेच तो सर्वांनाच जमत नाही. उपवासाचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही तुम्हाला जमेल त्या प्रकारचा उपवास करू शकता. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये (Intermittent Fasting) खाण्याबद्दलचा कोणताही नियम न पाळता काही कालावधीनंतर उपवास केला जातो. ड्राय फास्टिंगमध्ये (Dry Fasting) पाणीही न पिता उपवास केला जातो.'

Web Title: health benefits of fasting, know if fasting is good for your health or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.