लाल टोमॅटो नेहमीच खात असाल, आता कच्च्या टोमॅटोचे फायदे वाचा; रोज हेच खाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:40 IST2025-03-05T10:35:39+5:302025-03-05T10:40:06+5:30
Green Tomato Benefits: हिरव्या टोमॅटोमध्येही अनेक पोषक तत्व असतात. जे शरीराला अनेक फायदे देतात. अशात कच्च्या टोमॅटोचे काय काय फायदे होतात हे आज जाणून घेऊ.

लाल टोमॅटो नेहमीच खात असाल, आता कच्च्या टोमॅटोचे फायदे वाचा; रोज हेच खाल!
Green Tomato Benefits: लाले लाल आणि टवटवीत टोमॅटोचा वापर भारतीय किचनमध्ये रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. कुणी जेवणासोबत सलाद म्हणूनही टोमॅटो खातात. रसदार टोमॅटो खाणं लहान मुलांनाही खूप आवडतं. जास्तीत जास्त लोक लाल टोमॅटोंचा वापर करतात. त्यांचे फायदेही माहीत असतात. मात्र, अनेकांना हिरव्या टोमॅटोंचे फायदे माहीत नसतात. हिरव्या टोमॅटोमध्येही अनेक पोषक तत्व असतात. जे शरीराला अनेक फायदे देतात. अशात कच्च्या टोमॅटोचे काय काय फायदे होतात हे आज जाणून घेऊ.
कच्च्या टोमॅटोचे फायदे
इम्यूनिटी वाढते
लाल टोमॅटोप्रमाणे कच्च्या टोमॅटोनं देखील शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. अशात इम्यूनिटी मजबूत झाल्यानं शरीराचा वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.
वजनही होतं कमी
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कच्च्या टोमॅटोमुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण यात कॅलरी कमी असतात आणि फायबर भरपूर असतं. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि अशात भूक कमी लागते.
हृदयासाठी फायदेशीर
कच्चे टोमॅटो नियमितपणे खाल्ल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि ब्लड प्रेशरही कंट्रोल राहतं. कारण यात पोटॅशिअम आणि फायबर भरपूर असतं. हृदयासंबंधी अनेक आजारांचा यामुळे धोका कमी होतो.
पचनक्रिया सुधारते
टोमॅटोमध्ये फायबर भरपूर असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यात मदत मिळते. तसेच गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होतात.
त्वचेलाही मिळतात फायदे
कच्च्या टोमॅटोमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्यामुळे त्वचा ग्लो होते आणि हेल्दी राहते. यामुळे सुरकुत्याही दूर होण्यास मदत मिळते.
हाडं मजबूत होतात
हिरव्या टोमॅटोमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन के सुद्धा भरपूर असतं. या गोष्टी हाडं मजबूत करण्यास मदत मिळते. हाडांसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास यानं मदत मिळते.
डायबिटीसच्या रूग्णांसाठीही चांगले
हिरव्या टोमॅटोमुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे हे टोमॅटो डायबिटीसच्या रूग्णांसाठी चांगला पर्याय ठरतात