सॉल्ट थेरपी सध्या ट्रेन्डमध्ये असून ही एक नॅचरल थेरपी असून यामध्ये कोणत्याही औषधांचा वापर करण्यात येत नाही. यामध्ये व्यक्तींना मीठ आणि जमिनीच्या मध्ये ठेवण्यात येतं. शरीरावर पसरवण्यात आलेलं मीठ शरीर हळूहळू अवशोषित करतं. सायनोसायटिस (Sinusitis), अ‍ॅलर्जी, अस्थमा आणि श्वासासंबंधातील समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी ही थेरपी अत्यंत उपयोगी ठरते. व्यक्तीला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे याचा विचार करून मीठाच्या दाण्यांचा आकार ठरविला जातो. 

(Image Credit : Pink Salt Wal)

मिठामध्ये असणारे गुणधर्म... 

थेरपीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मिठामध्ये कॅल्शिअम, सोडियम आणि मॅग्नेशियम यांसारखे मिनरल्स असतात. व्यक्तीचं वय आणि त्याला सामना कराव्या लागणाऱ्या समस्या यांच्यानुसार, थेरपीचा वेळ ठरविण्यात येतो. 

कसं काम करते ही थेरपी? 

45 मिनिटांच्या या थेरेपीमध्ये खोलीमधील वातावरणात ओलावा असतो. तसेच तेथील तापमान (18 ते 22 डिग्री सेल्सियस) म्हणजेच, थोडसं दमट ठेवण्यात येतं. ही थेरपी दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये करण्यात येते. ओली थेरपी आणि सुकी थेरपी. या थेरपीला हेलोथेरपी म्हणूनही ओळखलं जातं. 

सॉल्ट थेरपीचे फायदे... 

इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी 

थेरपी दरम्यान मीठाचे कण श्वासामार्फत फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे संक्रमणापासून सुटका मिळते. 

स्किनच्या समस्यांपासून सुटका 

सॉल्ट थेरपीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्वचेसंबंधीच्या समस्या, पिंपल्स, एक्जिमा, सोरायसिस, टॉन्सिलायटिस किंवा फायब्रॉइड्सच्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरतात. त्वचेवर येणारे छोटे किंवा मोठे निशाण दूर करण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठीही सॉल्ट थेरपी फायदेशीर ठरते. 

(Image Credit : NeuRA)

स्नायूंच्या वेदना

ज्या व्यक्तींचे स्नायू कमजोर असतात आणि नेहमीच हाडांच्या वेदनांचा सामना करावा लागत असेल तर, त्यांच्यासाठी सॉल्ट वॉटर बाथ थेरपी अत्यंत फायदेशीर ठरते.

श्वासनासंबंधातील आजार 

सॉल्ट थेरपी अस्थमा आणि ब्रोकायटिस यांसारख्या आजारांसंबंधातील समस्या दूर करण्यासाठी मदत करते. 

तणावापासून सुटका 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सॉल्ट थेरपी चिंता, ताण आणि डिप्रेशन यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडीत समस्यांपासून सुटका करण्यासाठी मदत करते. 

पिंपल्स आणि चेहऱ्यावरील पुरळ 

सॉल्ट थेरपी बॉडी आणि स्किन डिटॉक्स करण्यासाठीही मदत करते. तसेच ही थेरपी ब्लड सर्क्युलेशन वाढविण्यासाठीही मदत करते. ज्यामुळे पिंपल्स, पुरळ यांसारख्या समस्या दूर होतात आणि त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. 

(टिप :  वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health and beauty benefits of salt therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.