VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:52 IST2025-07-28T12:52:28+5:302025-07-28T12:52:45+5:30
Hyderabad Heart Attack Death: हैदराबादमध्ये एका तरुणाचा शटल खेळत असतानाच हृयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
Hyderabad Heart Attack Death: गेल्या काही काळापासून लहान वयातच हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र आता शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळतानाही हृदयविकाराच्या झटक्याने अनेक तरुणांचे मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान षटकार मारल्यानंतर, फलंदाजाचा मैदानातच हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हैदराबादमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा शटल खेळताना हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हैदराबादमधील नागोले स्टेडियममध्ये शटल खेळत असताना एक तरुण अचानक जमिनीवर पडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गुंडला राकेश (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. राकेश खम्मम जिल्ह्यातील थल्लाडा गावातील माजी उपसरपंच गुंडला वेंकटेश्वरलू यांचा मुलगा आहे. राकेश हैदराबादमध्ये एका खाजगी कंपनीत काम करत होता. रविवारी तो त्याच्या मित्रासंह शटल खेळण्यासाठी नागोले स्टेडियममध्ये आला होता. मात्र शटल खेळत असतानाच त्याला मृत्यूने गाठलं. रात्री आठच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला.
रविवारी राकेश कोर्टवर शटल खेळत होता. त्याने शॉट खेळल्यानंतर तो थोडासा पुढे गेला. त्यानंतर समोरच्या कोर्टमधून कॉक मागे गेल्यामुळे तो आणण्यासाठी राकेश गेला. राकेश कॉक उचलून उभा राहत होता तितक्यात तो जोरात कोसळला. तितक्यात त्याच्या मित्रांनी धाव घेतली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. एकाने त्याला सीपीआर देखील देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी राकेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने राकेशच्या कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना जबर धक्का बसला.
शटल खेलते समय 25 वर्षीय गुंडला राकेश युवक की दिल का दौरा पड़ने से मौत
— Bolta Hindustan (@BJPLIV) July 28, 2025
नागोले स्टेडियम में शटल खेलते समय राकेश अचानक बेहोश हो गया
अस्पताल पहुँचने पर डॉक्टरों ने उसकी मृत्यु की पुष्टि की pic.twitter.com/lYzBGpdEvr
कोलेस्टेरॉलच नाही तर फॅट्समुळेही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, ६ लक्षणे दिसल्यास व्हा सावध!
दरम्यान, गेल्या महिन्यात सोशल मीडियावर षटकार मारल्यानंतर एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये फलंदाजाने षटकार मारल्यानंतर धावत होता. मात्र खेळपट्टीच्या मध्यभागीच तो गुडघे टेकून बसला आणि तोंडावर पडला. त्याला बेशुद्ध पाहून इतर खेळाडू त्याला मदत करण्यासाठी धावले आणि त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केले. पण तो शुद्धीवर आला आणि हृदयविकाराच्या झटक्याने लगेचच त्याचा मृत्यू झाला.