शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

केस गळणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षणं, वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:44 IST

ज्याप्रमाणे सर्दी आणि खोकला हे फ्लूचं (Flu) लक्षण समजलं जातं, त्याचप्रमाणे केस पातळ होणं, गळू लागणं हेदेखील आरोग्यविषयक समस्येचं लक्षण असतं. केसांमध्ये बदल होण्याची नेमकी काय कारणं आहेत, त्याविषयी जाणून घेऊ या...

केसांचं (Hair care tips) आरोग्य आणि सौंदर्य कायम राहावं, यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घेत असतो; पण एकंदर आरोग्याकडे दुर्लक्ष करून केवळ केसांची काळजी घेत असाल, तर तुमचे केस जास्त काळ सुंदर आणि निरोगी राहणार नाहीत. `एव्हरी डे हेल्थ`ने दिलेल्या माहितीनुसार, केसांचं टेक्श्चर, लांबी, लूक, दाटपणा यात दिसणारा बदल हा तुमच्या एकूण शारीरिक आरोग्यात काही तरी बदल झाल्याचं सूचक असतो, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

ज्याप्रमाणे सर्दी आणि खोकला हे फ्लूचं (Flu) लक्षण समजलं जातं, त्याचप्रमाणे केस पातळ होणं, गळू लागणं हेदेखील आरोग्यविषयक समस्येचं लक्षण असतं. केसांमध्ये बदल होण्याची नेमकी काय कारणं आहेत, त्याविषयी जाणून घेऊ या...

तणावामुळे होतात केस पांढरेजी व्यक्ती दीर्घ काळ तणावात (Stress) असते, त्या व्यक्तीच्या `डीएनए`वर परिणाम होऊन केस पांढरे होऊ लागतात, असं एका संशोधनातून दिसून आलं आहे. पिग्मेंटेशन प्रॉडक्शन सेल्स वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या ऑक्सिडेटिव्हचं कार्य तणावामुळे विस्कळीत होतं आणि त्यामुळे केस कमजोर होऊ लागतात.

थायरॉइडच्या (Thyroid) समस्येमुळे केस होतात पातळतुम्हाला हायपोथायरॉयडिझमची समस्या असेल तर शरीरातल्या थायरॉइड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉइड हॉर्मोनचं उत्पादन करू शकत नाहीत. त्यामुळे केस पातळ होऊन गळू लागतात.

अ‍ॅनिमिया (Anemia) असल्यास केस गळू लागतातशरीरात लोहाची कमतरता असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झालं असेल तर त्याचा थेट परिणाम केसांवर होतो. जेव्हा एखादी व्यक्ती अ‍ॅनिमियाग्रस्त होते, तेव्हा त्या व्यक्तीचे केस गळू (Hair Fall) लागतात.

 एस्ट्रोजेनच्या पातळीत एकदम बदल झाला तरीदेखील केस गळू शकतात; मात्र सर्वसामान्यपणे ही समस्या मासिक पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव झाल्याने किंवा गर्भधारणेनंतर दिसू लागते.प्रोटीनच्या (Protein) कमतरतेमुळे केस गळतात

केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीन अर्थात प्रथिनं आवश्यक असतात.केसांच्या वाढीसाठीही प्रोटीन्स गरजेची असतात. जेव्हा शरीरातली प्रोटीन्स कमी होऊ लागतात तेव्हा केस गळण्याची समस्या सुरू होते. अशा वेळी आहारात नॉनफॅट ग्रीक योगर्ट, छोले, डाळ आणि चिकन ब्रेस्ट यांचा समावेश करावा.

पोषक घटकांअभावी (Nutrition) केस होतात कोरडे आणि खराबशरीरात पोषक घटकांची कमतरता असेल, तर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात. ही समस्या पॉलीसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोममुळेदेखील उद्भवू शकते. अशा स्थितीत तुम्ही दैनंदिन आहारात सर्व प्रकारची जीवनसत्त्वं, खनिजं, क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स