सुरूवातीच्या काळात विणकाम हे महिलांचं आवडतं काम असायचं. आजकालच्या फॅन्सी आणि फॅशनेबल कपड्यांमुळे हाताने शिवलेल्या कपड्यांचे महत्व कमी झाले आहे. पण एकेकाळी घरातील महिला गरोदरपणात घरातील एखादी बाई असेल तर लगेच कपडे विणायची तयारी करायच्या. आत्ताच्या जमान्यात लोकांकडे कपडे विणायला इतका वेळ मिळत नाही. पण हाताने कपडे विणायचे फायदे वाचाल तर तुम्ही अवाक् व्हाल. महिलांच्या अनेक मानसीक तसंच शारीरिक समस्या दूर करण्यासाठी विणकाम फायदेशीर ठरत असतं.
काय आहे रिसर्च
(image credit- youtube)
२००९ मध्ये ब्रिटीश कोलंबिया युनिव्हर्सिटीकडून ३८ महिलांना घेऊन संशोधन करण्यात आले. ज्या महिला गंभीर इटिंग डिसोर्डरने प्रभावित होत्या. या महिलांना रोज विणकाम करण्याचा सल्ला देण्यात आला. वैज्ञानिकांच्यामते ७४ टक्के महिलांनी रेग्युलर विणकाम केल्यामुळे त्याची ताण-तणावाची समस्या दूर झाली. ज्यामुळे त्यांच आरोग्य चांगलं राहू लागलं आणि इटिंग डिर्सोडर सुद्धा बरा झाला.
यूकेच्या 'निट फॉस पीस' (Knit for Peace) मध्ये १५ हजारांपेक्षा जास्त विणकाम करत असलेल्या लोकांचे नेटवर्क आहे. हे कपडे शिवून ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत हे कपडे पोहोचवण्याचं काम केलं जातं. या संघटनेत काम करत असलेल्या लोकांना या गोष्टींचा पुरावा मिळाला आहे की शिवणकाम केल्यामुळे शरीर आणि मेंदू चांगले राहतात. याप्रकारे ब्रिटिश जर्नल ऑफ ओक्यूपेशनल थेरपी यांच्यानुसार विणकाम काम करण्याच्या सवयीला आपल्या आयुष्यात समाविष्ट केल्यामुळे ८१ टक्के लोक हॅप्पी राहू शकतात.
का फायदेशीर आहे शिवणकाम
ज्या लोकांचा विणकामावर हात बसलेला असतो. अशा लोकांना विणकाम करण्याची सवय झालेली असते. तरी सुद्धा विणकाम करत असताना मेंदूचे महत्वाचे भाग काम करत असतात. वैज्ञानिकांच्यामते या कारणामुळेच शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित आणि जलदगतीने होत असतो. ज्यामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे मिळत असतात. तसचं एकच स्टेप सतत केल्यामुळे सेरोटोनिन (हैप्पी हार्मोन) रिलीज होत असतो. त्यामुळे मुड चांगला राहतो. ( हे पण वाचा-ग्लुटेनयुक्त पीठ महिलांसाठी ठरतंय घातक; लग्न सुद्धा मोडतात, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा)
विणकामावर आधारीत रिसर्च करण्यात आला त्यावेळी असं निदर्शनास आलं की विणकाम फक्त एक कला नाही तर एका प्रकारे मानसीक स्थिती नीट ठेवण्यासाठी असलेला व्यायाम आहे. यामुळे मेंदूचे कार्य व्यवस्थित चालतं. विणकामामुळे न्युरोलॉजिकल आजार डिमेंशन, अल्जाईमर यांचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर विणकामामुळे क्रॉनिक पेनने सुद्धा आराम मिळतो. ( हे पण वाचा-२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!)