शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

डायबिटीसवर रामबाण आहे 'हे' फळं, आजारांना ठेवतं तुमच्यापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:16 IST

हिरव्या सफरचंदांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते.

फळं ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असल्याचे म्हटलं जातं, म्हणून तर डॉक्टर देखील आपल्या फळं खाण्याचा सल्ला देतात. त्यात सफरचंद शरीरासाठी खूपच चांगलं असल्याचं मानलं जातं. सफरचंदाबद्दल असे ही म्हटले जाते की, दररोज एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरपासून लांब ठेवू शकतो. म्हणजेच काय तर तो तुम्हाला कोणत्याही आजारापासून लांब ठेवतो. पण तुम्हाला याचे आणखी फायदे माहित आहेत?

पण आता सफरचंद म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर लाल किंवा थोड्या गुलाबी रंगाचा सफरचंद येईल. परंतु तुम्हाला माहितीय बाजारात हिरवा सफरचंद देखील आहे. तसे पाहाता हे सफरचंद लाल सफरचंदाइतकेच आरोग्यदायी असतात. मात्र, ते चवीला किंचित आंबट आणि गोड असतात. परंतू हिरव्या रंगाच्या सफरचंदाचे  स्वतःचे आरोग्य फायदे देखील आहेत. ते पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी परिपूर्ण आहेत जे संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहेत. हिरव्या सफरचंदांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते.

आता असे अनेक लोक आहेत, जे सफरचंदाची साल काढून खातात. परंतू तुम्ही असं करण्याची चूक करु नका, कारण यामध्ये त्याची सालच खूप आरोग्यादायी आहे. त्यात भरपूर फायबर असल्यामुळे सफरचंद शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हे यकृत आणि पचनसंस्थेला हानिकारक पदार्थांपासून दूर ठेवते. हे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करते. चला जाणून घेऊ की, हिरवे सफरचंद कोण-कोणत्या गोष्टीसाठी कसे फायदेशीर आहेत?

हिरवे सफरचंद रक्तातील कोलेस्टेरॉल आणि बीपी कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी आणि भूक सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहेत. हिरव्या सफरचंदांच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हिरवे सफरचंद वजन कमी करण्यास मदत करतातहिरव्या सफरचंदांमध्ये फायबर असते आणि त्यात फॅट, साखर आणि सोडियम कमी असते. हिरव्या सफरचंदाचा रस भूक कमी करण्यासाठी ओळखला जातो. शिवाय, ते कॅलरी बर्न करण्याची क्षमता सुधारते, जे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यात मदत करते.

हिरवे सफरचंद तुमच्या यकृतासाठी चांगले असतातनैसर्गिक डिटॉक्सिफायिंग एजंट असण्यासोबतच हिरव्या सफरचंदाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सला यकृताचे नुकसान होण्यापासून रोखतात. हे यकृतामध्ये जळजळ होण्यास प्रतिबंध करते. तसेच नेहमी फुगलेले पोट (bloating) ला देखील कमी करण्यात मदत करते, ज्यामुळे पोट देखील कमी होते.

फुफ्फुसासाठी फायदेशीरअभ्यास दर्शविते की हिरव्या सफरचंदाच्या रसाचा नियमित वापर केल्याने दम्याचा धोका 23% कमी होतो. जे लोक नियमित धूम्रपान करतात ते देखील त्याचा रस पिऊ शकतात. याद्वारे ते फुफ्फुसाच्या अडथळ्यांच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात.

मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव नियंत्रित करतेहा हिरवा सफरचंदाचा रस व्हिटॅमिन केचा संभाव्य स्रोत आहे, एक घटक जो रक्ताच्या गुठळ्या होण्यास मदत करतो. जे लोक हा रस पितात त्यांच्यात जखमा दुरुस्त आणि बरे करण्याची क्षमता असते. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव आणि वेदना होतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यासाठी महिलाही या पेयाचा वापर करू शकतात.

हिरव्या सफरचंदांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जसे की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फिनोल्स, अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करतात. शरीरात असलेल्या फ्री रॅडिकल्समुळे सुरकुत्या, बारीक रेषा आणि काळे डाग येऊ लागतात. या अँटिऑक्सिडंट-समृद्ध पेयाचा नियमित वापर केल्याने शरीराला या मुक्त रॅडिकल्सशी लढा देण्यात आणि त्यामुळे होणारे नुकसान दूर करण्यात मदत होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स