शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या उपचारासाठी लसूण गुणकारी? संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:40 IST

लसूण तेलाची जैविक क्रिया आणि गुणात्मक रचना याबाबत विश्लेषण केले जात आहे. हा अभ्यास COVID-19 च्या उपचारात लसूण तेलाचे फायदे समोर आणण्यात मदत करू शकतो.

जगभरातील शास्त्रज्ञ आपापल्या स्तरावर कोरोनावर उपचार करण्यात गुंतले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विविध नैसर्गिक घटकांद्वारे त्यावर उपचार करण्याचे मार्ग शोधले जात आहेत.भारतीय शास्त्रज्ञ कोरोनाच्या उपचारासाठी लसणाच्या अर्काचा अभ्यास करत आहेत. अहवालानुसार, मोहालीमधील सेंटर ऑफ इनोव्हेटिव्ह अँड अप्लाइड बायोप्रोसेसिंग (CAIB) आणि फरीदाबादमधील रीजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (RCB) चे शास्त्रज्ञ ACE2 प्रोटीनचे संभाव्य अवरोधक म्हणून लसूण तेल वापरण्यासाठी संशोधन करत आहेत.

बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “लसूण तेलाची जैविक क्रिया आणि गुणात्मक रचना याबाबत विश्लेषण केले जात आहे. हा अभ्यास COVID-19 च्या उपचारात लसूण तेलाचे फायदे समोर आणण्यात मदत करू शकतो. त्यांनी पुढे सांगितलं की, अनेक बाबींवर याचा अभ्यास करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, मोहालीच्या सेंटर ऑफ इनोव्हेटिव्ह अँड अप्लाइड बायोप्रोसेसिंगच्या शास्त्रज्ञ सुचेता खुब्बर यांनी सांगितले की, लसणात असलेली ऑर्गनोसल्फर आणि फ्लेव्होनॉइड संयुगं रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ते म्हणाले, दैनंदिन आहारात लसूण आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचं सेवन केल्याने रोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मुख्य औषधांमुळे होणारे दुष्परिणाम आणि विषारीपणा कमी होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी सांगितल की, अभ्यासानुसार, लसूण तेल हा महत्त्वाचा नैसर्गिक अँटीव्हायरस स्त्रोत आहे, जो मानवी शरीरात कोरोना विषाणूचा हल्ला रोखण्यात योगदान देतो. यूके आणि चीनमध्येही असेच अभ्यास केले जात आहेत.

आयुर्वेद डॉक्टरांचा दावा

लसूण हे विषाणू आणि बॅक्टेरियाविरूद्ध प्रभावी नैसर्गिक प्रतिजैविकांपैकी एक आहे, असा आयुर्वेदिक डॉक्टरांचा दावा आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त

सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझाविरूद्ध पारंपरिक औषधांपैकी लसूण एक महत्त्वाचं औषध आहे.

लसूण तेलामध्ये ऑर्गनोसल्फर संयुगे असतात. ते मजबूत अँटिऑक्सिडेंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल, अँटीकॅन्सर आणि प्रतिजैविक गुणधर्म दर्शवतात.

 २००६च्या अभ्यासात असे आढळून आले की कच्चा लसूण रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास तसंच, एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो.

लसणाचं नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

लसूण हे व्हिटॅमिन B6 आणि C चा देखील चांगला स्रोत आहे. कार्बोहायड्रेटच्या चयापचयामध्ये हे घटक महत्त्वाच्या भूमिकेत असतात. रक्तातील साखरेची पातळी राखण्यात व्हिटॅमिन 'सी'देखील भूमिका बजावू शकतं.

लसूण जास्त खाण्याचे अनेक तोटेरक्तस्त्राव होण्याचा धोकालसूण हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे मानले जाते, त्यामुळे जर तुम्ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर वॉरफेरिन, ऍस्पिरिन सारखी औषधे एकत्र घेऊ नका. कारण, यामुळं तुमचं रक्त पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकतं.

उलट्या आणि मळमळ कारणनॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ यूएसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने अनेकांना मळमळ, उलट्या आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. वास्तविक, लसणात काही संयुगे असतात, ज्यामुळे आम्लपित्त होऊ शकते.

यकृतासाठी धोकादायकअनेक अभ्यासांनुसार, लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे एक संयुग असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृताला विषबाधा होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स