शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ किडनीच नाहीतर पित्ताशयातही होतात स्टोन, जाणून घ्या लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:43 IST

Gallbladder stone : केवळ किडनीच नाही तर पित्ताशयातही स्टोन तयार होतात. ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. जाणून घ्या लक्षणे...

Gallbladder stone :  सगळ्यांनाच किडनी स्टोनबाबत माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पित्ताशयातही स्टोन होतात. त्याहून गंभीर बाब म्हणजे यावर कोणताही घरगुती उपाय किंवा औषध नाही. जास्तीत जास्त केसेसमध्ये यावर उपाय म्हणून सर्जरीच्या वेळ येते. या वेदनादायी समस्येपासून वाचवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.

पित्ताच्या स्टोनवर उपाय

गॉलब्लॅडरमध्ये लिव्हरमधून निघणारे बाइल ज्यूस म्हणजे पाचन रस असतात आणि नंतर ते छोट्या आतड्यांमध्ये जातात ज्यामुळे अन्न पचतं. याला पित्ताची पिशवीही म्हटलं जातं. अनेकदा या पिवशीमध्ये स्टोन तयार होतात, ज्याला पित्ताशयाचे स्टोन म्हटलं जातं. जास्तीत जास्त केसेसमध्ये हे ऑपरेशन करूनच काढले जातात.

का तयार होतात हे स्टोन?

मुळात लिव्हरमधून येणार बाइल ज्यूस म्हणजे पाचन रस स्टोन होण्याचं कारण बनतो. अनेकदा बाइल ज्यूस जड असतो आणि स्टोनचं रूप घेऊन तिथेच जमा होतो.पित्ताशयातील स्टोनचा आकार वाळूच्या कणांसारखा छोटा ते गोल्फ बॉल इतका असू शकतो. काही लोकांमध्ये एक तर काही लोकांमध्ये अनेक स्टोन विकसित होतात.

या लक्षणांकडे द्या लक्ष

पोटाच्या वर डाव्या बाजूला अचानक जोरात वेदना, पोटाच्या मधे किंवा छातीच्या हाडांखाली वेदना होत असेल, पाठीत वेदना होत असेल, डाव्या खांद्यात वेदना होत असेल आणि मळमळ किंवा उलटी होत असेल तर लगेच सावध व्हा.

पोटात गंभीर वेदना होत असेल ज्यामुळे बसणं किंवा उठणं अवघड झालं अशेल, त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडला असेल, थंडी वाजून ताप येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जावं.

स्टोन तयार का होतात?

कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याने, bilirubin लेव्हल वाढल्याने किंवा पित्तात जास्त बाइल ज्यूस न निघाल्याने स्टोनची समस्या होते.

कसा कराल उपाय

जेवण करणं टाळू नका, वजन कमी करा, हाय फायबर असलेले फूड्स खावेत. ही सगळी कामे केल्याने तुमच्या पित्ताच्या पिशवीत स्टोन होणार नाहीत. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य