कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा? जाणून घ्या योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:50 IST2025-02-27T14:48:56+5:302025-02-27T14:50:14+5:30
Garlic To Get Rid of Bad Cholesterol : शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा लसूण खाणं अनेकांना अवघड जातं.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा? जाणून घ्या योग्य पद्धत!
Garlic To Get Rid of Bad Cholesterol: लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक शक्तीशाली वनस्पती मानलं गेलं आहे. कारण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा लसूण खाणं अनेकांना अवघड जातं. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कच्च्या लसणाऐवजी कसा खावा याबाबत आम्ही सांगणार आहोत.
लसणातील पोषक तत्व
लसणांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जे इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतं. लसणांमध्ये सेलेनियम आढळतं. तसेच यात फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. इतकंच नाही तर यात अॅंंटी-एजिंग गुणही असतात. ज्यामुळे त्वचा तरूण आणि चमकदार दिसते. लसणामधील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीरात होणारी वेदना आणि सूज कमी करतात.
लसणाचे आरोग्याला होणारे फायदे
लसूण नियमितपणे खाल्ल्यास पचनासाठी आवश्यक तत्व वाढतात आणि पचन चांगलं होतं. लसणामुळे भूक वाढते. लसूण खाल्ल्यानं पोटात अॅसिड बनत नाही आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल टॉयलेटमध्ये खूप वेळ बसावं लागत असेल तर लसणानं ही समस्या दूर होते. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लसणामुळे हृदयासंबंधी अनेक आजारांचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर लसणामुळे शुगर कंट्रोल होते. तसेच शरीरातील अनेक विषारी तत्व बाहेर पडतात.
लसूण भाजून खाण्याचे फायदे
जर तुम्हाला कच्चा लसूण खाणं अवघड जात असेल किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लसूण खाऊ शकता. लसणाच्या काही कळ्या तूपात भाजून खाल्ल्यास बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास अधिक मदत मिळते. तसेच लसूण तूपामध्ये भाजून खाल्ल्यास इम्यूनिटी बूस्ट होते. लसूण तूपात भाजून खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी दूर होते.