सणवारात गोडधोड खाऊन रक्तातील शुगर वाढलीयं? 'हे' पदार्थ खा लगेच शुगर नियंत्रणात येईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 06:06 PM2021-11-10T18:06:49+5:302021-11-10T18:10:19+5:30

बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे डायबिटीसचे प्रमाण वाढते आहे. यावर वैद्यकीय उपचार नक्कीच करावेत पण आहारात हे पदार्थ समाविष्ट करुन तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता...

this foods will help you to keep sugar in control in diabetes | सणवारात गोडधोड खाऊन रक्तातील शुगर वाढलीयं? 'हे' पदार्थ खा लगेच शुगर नियंत्रणात येईल...

सणवारात गोडधोड खाऊन रक्तातील शुगर वाढलीयं? 'हे' पदार्थ खा लगेच शुगर नियंत्रणात येईल...

Next

बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे डायबिटीसचे प्रमाण वाढते आहे. यावर वैद्यकीय उपचार नक्कीच करावेत पण आहारात हे पदार्थ समाविष्ट करुन तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता...

बीन्स - राजमा हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता कमी असते. अशा प्रकारे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे आपण आपल्या आहारामध्ये राजम्यांचा समावेश केला पाहिजे.

बदाम - बदामामध्ये मॅग्नेशिय भरपूर असतात. हे तुमच्या शरीराला इन्सुलिन अधिक प्रभावीपणे वापरण्यास मदत करते. बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

पालक - एक कप पालकमध्ये 21 कॅलरीज असतात. हे मॅग्नेशियम आणि फायबरने परिपूर्ण आहे. जे रक्तातील साखरेसाठी चांगले आहे. तसेच तुम्ही पालक पनीर आणि ऑलिव्ह ऑइलसोबत तळलेल्या पालकाचा आस्वाद घेऊ शकता. 

हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. हा एक घटक आहे जो तुमचा स्वादुपिंड निरोगी ठेवू शकतो आणि प्रीडायबेटिसला टाइप 2 मधुमेहात बदलण्यापासून रोखू शकतो. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हळदीचा समावेश करू शकता.

कॅमोमाइल चहा बऱ्याच काळापासून विविध आजारांसाठी वापरला जातो. त्यात अँटीऑक्सिडंट आणि कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. याशिवाय अलीकडील संशोधनात असे आढळून आले आहे की ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Web Title: this foods will help you to keep sugar in control in diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.