दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 01:02 PM2018-09-02T13:02:30+5:302018-09-02T13:04:21+5:30

दिवसाची सुरुवात चांगली झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो, असं आपण नेहमीच ऐकतो. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही घाईगडबडीत, धावपळीमध्ये, ऑफिसची अथवा शाळा-कॉलेजची तयारी करण्यात जाते.

follow these tips to start the day well | दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स !

दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स !

दिवसाची सुरुवात चांगली झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो, असं आपण नेहमीच ऐकतो. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही घाईगडबडीत, धावपळीमध्ये, ऑफिसची अथवा शाळा-कॉलेजची तयारी करण्यात जाते. मग एखादी वस्तू विसरून घरातच राहते किंवा पोहोचायला उशिर झाल्यामुळे कामं अपूर्ण राहतात. अशातच सकाळी नाश्ता करणं राहून जातं आणि समोर पडलेल्या कामाच्या तणावामुळे दुपारच्या जेवणाकडेही बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. त्यामुळे आपल्या डेली रूटीनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दिवसाची सुरुवात चांगल्या रूटीनने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. एवढचं नाही तर दिवसभर प्रसन्न राहण्यास मदत होते आणि अनेक रोगांपासूनही शरीराचा बचाव होतो. जाणून घेऊयात दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी काही उपयोगी टिप्स...

रात्री लवकर झोपणं

दिवसभराच्या कामामुळे आणि धावपळीमुळ शरीर थकलेलं असतं. त्यामुळे त्याला व्यवस्थित झोपेची गरज असते.  रात्री सर्व कामं आटपून लवकर झोपल्यामुळे झोप पूर्ण होते.

सकाळी लवकर उठणं

शरीराला 8 तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे निरोगी आणि प्रसन्न राहण्यास मदत होते. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्यामुळे सकाळीची कामं धावपळीमध्ये न करता व्यवस्थित करण्यास वेळ मिळतो. तसेच सकाळचा पोटभर नाश्ताही करणं शक्य होतं.

चहा-कॉफी ऐवजी हर्बल टी घ्या

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते. झोपेतून उठल्यावर दिवसाची सुरुवात करताना पिण्यात येणारं पेय शरीरासाठीही आरोग्यदायी असणं गरजेचं असतं. सकाळी सकाळी अनोशापोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीरातील अॅसिडची पातळी वाढते. त्यामुळे अॅसिडिटी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे चहा कॉफी ऐवजी जर हर्बल टीचा वापर केला तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

मेडिटेशनने करा दिवसाची सुरुवात

दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी मेडिटेशनचा पर्याय उत्तम आहे. मेडिटेशनमुळे धावपळीच्या कामांमधून थोडा वेळ का होईना मनाला शांतता लाभते. 

भरपेट नाश्ता

सकाळी सकाळी पोटभर केलेल्या नाश्त्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते हे तर आपण सारेच जाणतो. त्यासाठी सकाळी आरोग्यदायी आणि पोटभर नाश्ता करणं गरजेचं असतं. त्यासाठी ओट्स खाणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. तसेच यामध्ये तुम्ही दूध टाकूनही खाऊ शकता. 

Web Title: follow these tips to start the day well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.