...म्हणून उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी वॉक आणि वर्कआउट करणं ठरतं फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:17 PM2019-04-02T12:17:28+5:302019-04-02T12:17:55+5:30

अनेकजण आपल्या धावपळीच्या दिनक्रमामधून थोडासा वेळ सकाळी वॉक घेण्यासाठी काढतात. अशातच वातावरणातील वाढता उकाडा वाढल्यामुळे सकाळी वॉकसाठी जाणं नकोसं वाटतं.

Fitness why is evening time walking and workout is beneficial in the summer | ...म्हणून उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी वॉक आणि वर्कआउट करणं ठरतं फायदेशीर

...म्हणून उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी वॉक आणि वर्कआउट करणं ठरतं फायदेशीर

Next

अनेकजण आपल्या धावपळीच्या दिनक्रमामधून थोडासा वेळ सकाळी वॉक घेण्यासाठी काढतात. अशातच वातावरणातील वाढता उकाडा वाढल्यामुळे सकाळी वॉकसाठी जाणं नकोसं वाटतं. अशातच उन्हाळ्यामध्ये सकाळी वॉक घेण्याऐवजी संध्याकाळी वॉक घेणं जास्त सोयीस्कर असतं, असा विचार आला किंवा असं कोणी सांगितलं तरि अनेकजण त्या व्यक्तीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतात. पण खरचं संध्याकाळची वेळ फिरण्यासाठी व्यवस्थित ठरते का? बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोकांचा दिनक्रम पूर्णपणे बदलून गेला आहे. सध्या लोक सकाळी उठल्यानंतरही ऑफिस किंवा आपल्या कामाचा विचार करतात. त्यामुळे ते दिवसभरामध्ये कोणतंही वर्कआउट करू शकत नाहीत.

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, एका संशोधनातून याबाबत एक खुलासा करण्यात आला होता की, संध्याकाळी 6 ते 7 ची वेळ शरीराचा वर्कआउट करण्यासाठी सर्वात उत्तम असते. जाणून घेऊया याबाबत काही खास गोष्टी...

एक्सरसाइजसाठी उत्तम वेळ

जर तुम्ही दिवसभराच्या कामानंतर थकला असाल आणि हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करणं तुमच्यसाठी शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही वॉक करू शकता. यामुळे तुम्ही स्वतःला अगदी सहज फिट आणि हेल्दी ठेवू शकता. एवढचं नाही तर यामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढण्यासाठीही मदत होते. 

आराम मिळतो

दिवसभर कम्प्यूटरवर काम केल्यामुळे मसल्सला एक्सरसाइज करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. परंतु, इव्हनिंग वॉकमार्फत तुम्ही असं करू शकता. ज्यामुळे तुमचं शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी अर्ध्या तासासाठी संध्याकाळच्या वेळी वॉक घेणं आवश्यक असतं. 

शांत झोप 

शरीराचा थकवा घालवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शांत झोप गरजेची असते. तुम्हाला शांत झोप मिळण्यासाठी संध्याकाळी घेतलेला वॉक फार फायदेशीर ठरतो. कारण यामुळे तुम्हाला तणाव जाणवत नाही.

पचनसंस्था सुरळीत होण्यासाठी 

जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर वॉकसाठी जाता. त्यावेळी तुम्हाला खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी मदत होते. दरम्यान एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं की, जेवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी वॉकसाठी जा. 

रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी 

तुम्हाला कदाचित याबाबत माहिती नसेल की, संध्याकाळी वॉक केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. दरम्यान संध्याकाळी वॉक घेतल्याने शरीरातील सर्व अवयवांचा आराम होतो. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होण्यासाठी मदत होते. 

Web Title: Fitness why is evening time walking and workout is beneficial in the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.