Fitness, Weight Loss Funda: धुमशान! जिम सोडून अॅप्सद्वारे वजन कमी करतायत लोक; ही तीन सर्वाधिक डाऊनलोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:13 IST2023-01-10T13:09:56+5:302023-01-10T13:13:28+5:30
भारतात सध्या वजन वाढण्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सोबतच मानसिक रोगही होऊ लागले आहेत. कोरोना आल्यापासून या समस्येत मोठी वाढ झाली आहे.

Fitness, Weight Loss Funda: धुमशान! जिम सोडून अॅप्सद्वारे वजन कमी करतायत लोक; ही तीन सर्वाधिक डाऊनलोड
भारतात सध्या वजन वाढण्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सोबतच मानसिक रोगही होऊ लागले आहेत. कोरोना आल्यापासून या समस्येत मोठी वाढ झाली आहे. लोक जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मानसिकदृष्ट्या कसे निरोगी राहता येईल? हाच मोठा प्रश्न आहे.
या दोन्ही समस्यांना काही अॅप्स उत्तर ठरत आहेत. या अॅप्सद्वारे युजर्स आपले वजन कमी करून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका रिपोर्टनुसार अनेक लोकांनी जिम सोडून हीच अॅप फोनमध्ये डाऊनलोड केली आहेत. लोकांचे वजनही घटू लागले आहे, कोणती आहेत ही एप..
नींद (Neend)
स्लीप हे रिलॅक्स, स्लीप, मेडिटेशन अॅप आहे. त्याची संस्थापक सुरभी जैन आहे, जी राजस्थानमधील एका छोट्या शहरातील आहे. ती आयआयटी मुंबईची विद्यार्थिनी आहे. कोरोनानंतर निद्रानाशाची तक्रार वाढली होती. यामुळे तिने हे अॅप बनविले आहे. स्टोरीज, स्मूथ स्लीप साउंड, मेडिटेशन आदी या अॅपमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. वापरकर्त्यांना 7 ते 8 तास शांत झोप मिळते, असा दावा केला जात आहे. हे अॅप 100K पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहे.
BunkerFit-Strong Body & Mind
हे अॅप कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस प्रोग्रॉमचे आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सक्रिय जीवनशैलीवर भर दिला जातो. इमर्सिव ट्रेनिंग वर्कआउट, योगा वर्कआउट, स्लीप मॉड्यूल, श्वासोच्छवासाचा व्यायाम यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. हे अॅप Google Play Store वरून 100K पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहे. सामान्य माणूसही ते वापरू शकतो.
Dance Workout for Weight Loss
या अॅपच्या मदतीने डान्सिंग, एरोबिक डान्स वर्कआऊट, बेली डान्स शिकता येईल. याद्वारे यूजर्स आपले वजन कमी करू शकतात. यामध्ये फिटनेस नोट्सही दिल्या जात आहेत. गुगल प्ले स्टोअरवर त्याचे रेटिंग 4.1 च्या आसपास आहे.