तज्ज्ञ म्हणे: कशाला घालता जिमचे हेलपाटे? त्याशिवायही वजन कमी करणे अतिशय सोपे! खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:07 IST2022-07-14T17:04:07+5:302022-07-14T17:07:22+5:30
जे लोक काही कारणांमुळे जिममध्ये जाऊ शकत नाहीत. ते स्वतःला फिट कसे ठेवतील? आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊया (Fitness Tips By Fitness Experts) की, घरच्याघरी आपल्याला फिट कसे राहता येईल.

तज्ज्ञ म्हणे: कशाला घालता जिमचे हेलपाटे? त्याशिवायही वजन कमी करणे अतिशय सोपे! खास टिप्स
सध्याच्या काळात बहुतेक लोकांची जीवनशैली बिघडली आहे आणि त्यांना स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे खूप कठीण झाले आहे. निरोगी राहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जिममध्ये जातात आणि तेथे तासनतास कसरत करण्यात घालवतात. जिममध्ये जवळपास सर्व वयोगटातील लोक व्यायाम करताना दिसतात. मात्र जे लोक काही कारणांमुळे जिममध्ये जाऊ शकत नाहीत. ते स्वतःला फिट कसे ठेवतील? आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊया (Fitness Tips By Fitness Experts) की, घरच्याघरी आपल्याला फिट कसे राहता येईल.
फिटनेस तज्ञ काय म्हणतात?
आरोग्य आणि फिटनेस प्रशिक्षक अरुण सिंग यांच्या मते, निरोगी आणि फिट राहण्यासाठी जिममध्ये जाणे आवश्यक नाही. जर तुम्ही घरी किंवा उद्यानात शारीरिक हालचाली किंवा थोडा व्यायाम करत असाल तर तेही तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली, संतुलित आहार, उत्तम जीवनशैली यासह काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही योगा आणि ध्यानाद्वारेही फिटनेस सुधारता येऊ शकते.
या टिप्स फॉलो करा
- फिट आणि निरोगी राहण्यासाठी चालणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी काही किलोमीटर चालत जाऊ शकता. अनेकांना धावणे देखील आवडते. धावणे आणि चालणे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
- तुम्ही घर किंवा जवळच्या उद्यानात जाऊन थोडा वेळ योगा आणि ध्यान करू शकता. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारेल.
- जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी एक प्लस पॉइंट देखील ठरू शकते. दररोज काही मिनिटे नृत्य केल्याने आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
- निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. हंगामी फळे आणि भाज्या जरूर खा. मात्र कोणत्याही पदार्थाचे अति सेवन टाळावे.
- प्रत्येकाने आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करावी. रात्री उशिरापर्यंत जागणे आरोग्यासाठी चांगले नाही. दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असते आणि कमीत कमी ताण घ्यावा.