Fitness : ...म्हणून सेलेब्स असतात एवढे फिट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 13:16 IST
फिटनेस आणि सेलिब्रिटी हे जणू समिकरणच आहे. फिटनेससाठी प्रत्येक सेलिब्रिटी जिम, योगा, डायट अशा प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष देत असतात. शिवाय ते कोणत्या ऋतूत पाणी कसे प्यावे, या गोष्टीचीही ते खूप काळजी घेतात, म्हणून सेलेब्स एवढे फिट असतात.
Fitness : ...म्हणून सेलेब्स असतात एवढे फिट !
फिटनेस आणि सेलिब्रिटी हे जणू समिकरणच आहे. फिटनेससाठी प्रत्येक सेलिब्रिटी जिम, योगा, डायट अशा प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष देत असतात. शिवाय ते कोणत्या ऋतूत पाणी कसे प्यावे, या गोष्टीचीही ते खूप काळजी घेतात, म्हणून सेलेब्स एवढे फिट असतात. बहुतांश लोकांना फ्रिजमधले थंड पाणी पिण्याची सवय असते. थंड पाणी घेतल्याशिवाय त्यांची तहानच पूर्ण होत नाही. मात्र हेच थंड पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे एका संशोधकात निष्पन्न झाले आहे. त्याऐवजी गरम पाणी आरोग्याऐवजी १०० टक्के ऊपयुक्त असल्याचाही दावा जपानच्या चमूने केला आहे. डोकेदुखी, मायग्रेन, उच्च रक्त दाब, कमी रक्त दाब, सांधेदुखी, हृदयाचे कमी जास्त ठोके, चरबीचे प्रमाण वाढणे, खोकला, शारीरिक थकवा, दमा, लघवी संदर्भातील आजार, पोटाचे आजार, भुकेसंदर्भात तसेच कान, नाक, घसा संदर्भातील आजार गरम पाणी सेवन केल्याने कमी होत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. शिवाय गरम पाणी पिण्याच्या उपचार पद्धतीमुळे आपल्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होण्यास मदत होते. त्यात मधुमेह एक महिन्यात, रक्त दाब एक महिन्यात, पोटासंदर्भातील आजार १० दिवसात, सर्व प्रकारचे कर्क रोग नऊ महिने, भुकेसंदर्भातील दहा दिवसात, लघवी संदभार्तील दहा दिवसात, कान, नाक, घसा दहा दिवसात, स्त्रियांच्या समस्या पंधरा दिवसात, हृदयासंदभार्तील आजार एक महिन्यात, डोकेदुखी आणि निगडित आजार तीन दिवसात, कमी रक्त दाब एक महिन्यात, अतिरिक्त चरबी चार महिने, लकवा संदर्भात सातत्याने नऊ महिने, दमा चार महिने कालावधीत बरे होतात असा दावा करण्यात आला आहे. * गरम पाणी कसे सेवन कराल? सकाळी लवकर उठावे आणि अंशी पोटी कमीत कमी चार ग्लास गरम पाणी व्यावे. त्यानंतर ४५ मिनिटे काही खाऊ नये. सुरुवातीला तुम्हाला चार ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल. पण सुरुवात केली तर सोपं होईल. * थंड पाण्याचे दुष्परिणाम पूर्वी लोकं सांगायचे की, तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो. थंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो. थंड पेयेदेखील हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात. थंड पाण्याने यकृतावर दुष्परिणाम होतात. याने यकृतमध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात यकृत ट्रान्सप्लांटचे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात. जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात. थंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो. थंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.