शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

गॅसमुळं पोट फुग्यासारखं फुगलंय? लगेच करा घरगुती उपाय, बघा चटकन वाटेल बरं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:43 IST

Home Remedies For Stomach Gas : या समस्या दूर करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय आहे. तो म्हणजे आलं आणि बडीशेपचा चहा. हा उपाय प्रभावी आणि फायदेशीर ठरतो.

Home Remedies For Stomach Gas : आजच्या धावपळीच्या जीवनात खाणं-पिण्यात झालेल्या गडबडीमुळे आणि स्ट्रेसमुळे पोटासंबंधी अनेक समस्यांचा सामना लोकांना करावा लागत आहे. पोटात गॅस होणं, पोट फुगणं, आंबट ढेकर, अपचन अशा अनेक समस्या नेहमीच होत असतात. जेव्हा पोटात गॅस होतो तेव्हा तर व्यक्ती अस्वस्थ होतो आणि जडपणाही वाडतोत. त्यामुळे कोणत्या कामातही लक्ष लागत नाही. या समस्या दूर करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय आहे. तो म्हणजे आलं आणि बडीशेपचा चहा. हा उपाय प्रभावी आणि फायदेशीर ठरतो. यानं पोटाला आराम मिळतो आणि गॅसची समस्याही दूर होते.

आलं आणि बडीशेपचा फायदा

आलं आणि बडीशेप दोन्ही गोष्टी पचन तंत्रासाठी खूप फायदेशीर असतात. आल्यामुळे डायजेशन सिस्टीम बूस्ट होतं. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होतं. तसेच गॅस आणि ब्लोटिंगची समस्याही दूर होते. 

तेच बडीशेपमधील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत तरतात. या गुणांमुळे गॅस आणि अपचन या समस्या लगेच दूर होतात. ज्यामुळे पोटाला आराम मिळतो.

बडीशेप आणि आल्याच्या चहाचे फायदे

बडीशेप आणि आल्याचा पिऊन पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर करता येऊ शकते. या चहानं पोटाच्या आतील सूज आणि गॅस फॉर्मेशन कमी होतं. जर तुम्हाला जेवण केल्यावर पोटात जडपणा, गॅस आणि ब्लोटिंग जाणवत असेल, तर हा चहा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. या चहामुळे डायजेशन सिस्टीम मजबूत राहतं आणि पोटाला आराम मिळतो.

आल्यामुळं पाचक रसाचं प्रमाण वाढतं आणि अन्न लगेच पचन होतं. त्याशिवाय हा चहा प्यायल्यानं छातीत होणारी जळजळ आणि अ‍ॅसिड रिफ्लक्ससारखी समस्याही कमी होते. ज्या लोकांना भूक कमी लागते किंवा काही खाल्ल्यावर उलटी आल्यासारखं जाणवतं, त्यांनाही या चहानं आराम मिळेल. जर तुम्ही दिवसातून दोनदा हा चहा घ्याल, तर पोटही साफ राहील. गॅसची समस्याही दूर होईल.

कसा बनवाल हा चहा?

आलं आणि बडीशेपचा हा खास चहा बनवण्यासाठी १ चमचा बडीशेप आणि अर्धा इंच आलं घ्या. सगळ्यात आधी एका भांड्यात एक ग्लास पाणी टाका. त्यात बडीशेप आणि आलं बारीक करून टाका. हे मिश्रण चांगलं उकडू द्या. पाण्याचा रंग बदलेपर्यंत पाणी उकडू द्या. पाण्याचा रंग बदलला की, चहा गाळून एका ग्लासमध्ये काढा. तुमचा चहा तयार आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य