गॅस झाल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते मग, 'या' गोष्टींना आत्ताच गुड बाय करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:46 AM2021-07-25T11:46:40+5:302021-07-25T11:50:20+5:30

पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य जरी असली तरी काही लोकांना नेहमी ही समस्या असते. अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.

Feeling bloated due to gas, then do not eat these things from now ... | गॅस झाल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते मग, 'या' गोष्टींना आत्ताच गुड बाय करा...

गॅस झाल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते मग, 'या' गोष्टींना आत्ताच गुड बाय करा...

Next

पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य जरी असली तरी काही लोकांना नेहमी ही समस्या असते. या लोकांना नाश्ता केल्यावर, जेवण केल्यावर गॅसचा त्रास होतो. यामुळे, पोट दुखतं. यामागे आपला आहार आणि जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत. पुरेसे पाणी न प्यायल्यानेही हे होऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.


गव्हाचे पदार्थ
गव्हापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर तुम्हाला बहुतेकदा पोट फुगल्या सारखे वाटत असेल. मग ही लक्षणे सेलिआक नावाच्या रोगाचे असू शकते. ब्रेड, तृणधान्ये, बिस्किटे, पास्ता यासारख्या गोष्टी खाल्ल्यानंतर जर आपल्याला पोटाची समस्या उद्भवली असेल तर आपल्याला ग्लूटेन मुक्त आहार घेणे आवश्यक आहे. ग्लूटेन मुक्त आहार घेणे ही एक कठीण गोष्ट नाही. आता बरीच प्रकारच्या ग्लूटेन फ्री वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.

सोयाबीन
सोयाबीन आहारात हेल्दी मानले जाते यात काही शंका नाही, परंतु यामुळे गॅस देखील होऊ शकतो. कारण ते पचण्यासाठी जड असते. जर आपल्याला पोट फुगण्याचा त्रास असेल तर सोयाबीन खाणे टाळले पाहिजे.

फॅट्स
तळलेले आणि जास्त चरबीयुक्त अन्न खाल्ल्याने पोटावर दबाव येतो. एवढेच नाही तर या गोष्टी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अपचन या समस्या वाढतात. जर आपल्याला ब्लोटिंगची समस्या येत असेल तर आपण चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. या गोष्टी खाल्ल्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

कार्बोनेटेड पेय
बर्‍याच लोकांना असे वाटते की कार्बोनेटेड पेये प्यायल्याने पोट फुगण्याच्या समस्येपासून मुक्तता होईल. परंतु असे नाही कारण प्रत्यक्षात उलट घडते. कार्बोनेटेड पेयांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण हे पेय घेतो. तेव्हा आपण जास्त प्रमाणात गॅस आत घेतो. जी आपल्या पाचन तंत्रासाठी हानिकारक असते.

खारट गोष्टी
जास्त खारट पदार्थ खाल्ल्याने शरीरातून द्रव बाहेर पडत नाही, ज्यामुळे पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. न्याहारीमध्ये चिप्स किंवा खारट पदार्थांऐवजी निरोगी गोष्टी खा.

Web Title: Feeling bloated due to gas, then do not eat these things from now ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.