घाईघाईत जेवल्यामुळे वजन वाढण्यासोबतच होऊ शकतो 'हा' गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 11:29 IST2019-12-26T10:46:15+5:302019-12-26T11:29:16+5:30
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यपिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता तसंच अपूरी झोप यांमुळे वेगवेगळ्या परिणामांचा सामना करावा लागतो.

घाईघाईत जेवल्यामुळे वजन वाढण्यासोबतच होऊ शकतो 'हा' गंभीर आजार
(Image credit- sheknow.com)
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यपिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता तसंच अपूरी झोप यांमुळे वेगवेगळ्या परिणामांचा सामना करावा लागतो. तसंच वेळेअभावी आपण जेवत असताना फारच घाई करून जेवत असतो. तसचं जेवणाचे घास पटापट घेत असतो. त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परीणाम होत असतो. जेवताना घाई केल्याने शरीराला मोठी किंमत मोजावी लागू शकते.
तज्ञांच्या म्हणण्यानूसार जेवणासाठी किमान २० मिनिटं तरी लागायला हवीत. तसेत जेवत असताना अन्न चावून खायला हवे. जर तुम्ही कमीतकमी २० मिनीटांचा वेळ जेवणासाठी घेतला तर तुम्ही व्यवस्थीत चावून अन्न खाऊ शकता. यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघमच्या संशोधकांनी असं स्पष्ट केलं आहे. की जेवण जास्तवेळ चावून खाल्ल्यामुळे तुम्ही कमी जेवता तसंच खाल्लेल्या अन्नाचं पचन सुद्दा उत्तमरीत्या होतं. त्यानंतर २ तासांनी काही खाण्याची सवय सुद्धा मिटते.
वजन वाढतं
जर तुम्ही पटापट जेवत असाल तर अन्न नीट चावून खाल्लं जात नाही. या सवयीमुळे तुमचं वजन वाढायला लागतं. या गोष्टीचा वाईट परिणाम असा होतो की, यामुळे आपल्या शरीरात मेटाबॉलीक सिन्ड्रोमवर सुद्धा प्रभाव पडु शकतो. ज्याचा थेट संबंध तुमच्या वजनाशी असतो. तुम्ही जेव्हा हळूहळू व्यवस्थीत वेळ घेऊन जेवता त्यावेळी तुम्ही योग्य तेवढे आणि प्रमाणात खाता. त्यामुळे शरीरातील हार्मोन्लचं संतुलन व्यवस्थीत राहतं. जर या पध्दतींचा तुम्ही जेवणासाठी वापर केलात तर आरोग्य उत्तम रहीस तसंच लठ्ठपणाचा धोका टळेल.
गंभीर आजार
घाईघाईत खाल्ल्याने डोक्याला विशिष्ट संदेश मिळत असतो. ज्यामुळे हार्मोन्सवर नकारात्मक परीणाम होत असतो. त्यामुळे इन्सुलीन प्रभावित होऊन टाईप २ डायबिटीस होण्याची शक्यता असते.
तोडांचे विकार
जेवण व्यवस्थीत चावून न खाल्ल्याल अन्न दातांमध्ये अडकतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅव्हीटीस होण्याची शक्यता असते. जेवण चाऊन खालल्याने तोंडात असणारे बॅक्टीरीया मिटण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही बॅक्टिरीअल इन्फेक्शनपासून वाचू शकता. अन्न चावून खाल्लाने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते.