Work from home tips: लॅपटॉपवर सतत तासन् तास बसून डोळ्यांचं आरोग्य येतंय धोक्यात, वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:37 PM2022-02-22T15:37:11+5:302022-02-22T15:45:36+5:30

लॅपटॉप किंवा मोबाईलवर बराचवेळ बसुन राहील्याने डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यात डोळ्यांमध्ये खाज, डोळे दुखणे, धुसर दिसणे अशा समस्या जाणवत आहेत. हे सर्व कशामुळे होते याची कारणे जाणून घेऊ. तसेच यावरील उपायही जाणून घेऊ...

eye problems because of work from home sitting on laptop or computer or mobile, solutions | Work from home tips: लॅपटॉपवर सतत तासन् तास बसून डोळ्यांचं आरोग्य येतंय धोक्यात, वेळीच करा 'हे' उपाय

Work from home tips: लॅपटॉपवर सतत तासन् तास बसून डोळ्यांचं आरोग्य येतंय धोक्यात, वेळीच करा 'हे' उपाय

googlenewsNext

सध्या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे अनेक व्याधी जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात डोळ्यांचे आरोग्य तर अत्यंत धोक्यात आले आहे. डोळ्यांच्या समस्येने ग्रस्त अनेक लोक सध्या डॉक्टरांकडे जात आहे. अशा पेशंट्सच प्रमाण ६० ते ७० टक्के आहे. लॅपटॉप किंवा मोबाईलवर बराचवेळ बसुन राहील्याने डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यात डोळ्यांमध्ये खाज, डोळे दुखणे, धुसर दिसणे अशा समस्या जाणवत आहेत. हे सर्व कशामुळे होते याची कारणे जाणून घेऊ. तसेच यावरील उपायही जाणून घेऊ...

डोळे कोरडे होणे
असं म्हणतात १ मिनिटात एखाद्या व्यक्तीच्या पापण्या १७ ते २० वेळा उघडझाप होतात. पापण्या मिटून उघडझाप झाल्याने डोळ्यात अश्रु येतात. या नैसर्गिक अश्रुंमुळे डोळ्यात थंडावा व ओलसरपणा राहतो जो डोळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळी आपण लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब किंवा मोबाईलवर तास्नतास बसून राहतो तेव्हा डोळ्यांची उघडझाप होत नाही. त्यामुळे डोळे कोरडे होतात. अशावेळी डोळ्यांना खाज येत राहते.

यावर उपाय काय?
डोळ्यांच्या पापण्यांचा मसाज करा

तुम्ही हलक्या हाताने डोळ्यांच्या पापण्यांचा मसाज करु शकता. तसेच तोंडावर हात ठेवुन तोंडावरील गरम हवा हातात जमा करा. हे हात डोळ्यांवरुन फिरवा. याचा डोळ्यांतील आर्द्रता कायम राखण्यामध्ये फार फायदा होतो.

दर वीस मिनिटांनी ब्रेक घ्या
तुम्ही लॅपटॉप अथवा कम्प्युटरवर काम करताना दर २० मिनिटांनी ब्रेक घेतला पाहिजे. त्या शिवाय मध्येमध्ये सारख्या पापण्या उघडझाप केल्या पाहिजेत. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येईल. डोळे थंड व ओलसर राहतील.

Web Title: eye problems because of work from home sitting on laptop or computer or mobile, solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.